
आपण सगळेच दररोज व्यवहार करताना ५०० रुपयांच्या नोटा वापरत असतो. पण ही खरी आहे की खोटी, याचा तुम्ही कधी विचार करता का? गृह मंत्रालयाने नुकताच एक गंभीर इशारा दिला आहे की देशात मोठ्या प्रमाणावर बनावट ५०० रुपयांच्या नोटा सापडत आहेत. त्यामुळे सतर्क राहण्याची गरज आहे.
या बनावट नोटा इतक्या हुबेहूब बनवल्या जात आहेत त्यामुळे त्या खऱ्या की खोट्या हे ओळखणं जवळपास अशक्य होतं. पण चिंता करण्याचं कारण नाही. गृह मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेने काही सोपी पद्धती सांगितल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही नकली नोट लगेच ओळखू शकता.
1. स्पेलिंग – खरी नोट असेल तर त्यावर इंग्रजीत “RESERVE BANK OF INDIA” असं स्पष्ट लिहिलेलं असतं. पण या बनावट नोटांमध्ये “RESERVE” या शब्दातील ‘E’ ऐवजी ‘A’ छापलेलं आहे. म्हणजे “RESARVE” असं चुकीचं लिहिलेलं असतं. ही एक लहानशी चूक खरी-खोट्या नोटेमधला मोठा फरक स्पष्ट करते.
2. रंग – अचूक स्पेलिंगसह छापल्या जातात. त्यामुळे आणखी एक पद्धत वापरणं महत्त्वाचं आहे. ५०० रुपयांच्या नोटेवर समोरच्या बाजूला हिरव्या रंगात ‘५००’ आकडा असतो. ती नोट तुम्ही थोडीशी तिरकी केलीत, तर हा आकडा निळ्या रंगात बदलतो. जर असं घडलं, तर नोट खरी आहे. पण जर रंगात कोणताही बदल झाला नाही, तर ती नोट बनावट असण्याची शक्यता आहे.
1. कोणतीही ५०० रुपयांची नोट घेताना, विशेषतः अनोळखी व्यक्तीकडून किंवा घाईगडबडीत, ती तपासून घ्या.
2. वर दिलेल्या दोन्ही पद्धती वापरा. फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून राहू नका.
3. जर तुम्हाला नोटेबद्दल शंका आली, तर ती स्वीकारण्यास नम्रपणे नकार द्या किंवा बँकेत जाऊन तपासून घ्या.