‘बरं झालं माझं लग्न झालं नाही’, मेरठ हत्याकांडानंतर असे का म्हणाले बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री

Bageshwar Dham Dhirendra Shastri : मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांडाने देशात खळबळच उडवली नाही तर अनेक नवरोबांना सुद्धा घाम फुटला आहे. घरातील निळ्या रंगाच्या ड्रमने त्यांची तंतरली आहे. त्यानंतर आता बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी सुद्धा त्यावर कटाक्ष टाकला आहे.

बरं झालं माझं लग्न झालं नाही, मेरठ हत्याकांडानंतर असे का म्हणाले बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री
बागेश्वर बाबा निळ्या ड्रमला का घाबरले?
Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 27, 2025 | 4:36 PM

Dhirendra Shastri Meerut : मेरठ हत्याकांडाने सध्या अनेक नवरोबांची झोप उडाली आहे. सौरभ राजपूत याची पत्नी आणि तिच्या प्रियकराने निर्घृण हत्या केली. त्यानंतर अनेक पती घरातील निळ्या ड्रमविरोधात उतरले आहेत. काहींनी हा ड्रमच घराच्या बाहेर फेकला आहे. तर काहींनी त्याची जागा बदलली आहे. सौरभची हत्या केल्यानंतर या दोन्ही आरोपींनी त्याच्या शरीराचे तुकडे केले. निळ्या ड्रममध्ये सिमेंट सह ते पुराल्याचे समोर आले होते. या सर्व प्रकरणावर बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी कटाक्ष टाकला आहे. त्यांनी सध्याच्या अनेक मुद्यांना थेट हात घातला.

या हत्याकांडाची केली निंदा

मेरठमध्ये सौरभ राजपूत याच्या क्रूर हत्येची त्यांनी निंदा केली. मुला-मुलींना योग्य संस्कार न दिल्याचे, त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने असे प्रकार घडत असल्याचे ते म्हणाले. भारतातील प्रत्येक घरात रामचरितमानस वाचण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. त्यांनी यावेळी मेरठमधील काही ठिकाणांची नावे बदलण्याची आग्रही मागणी केली.

बरं झालं मी लग्न नाही केलं!

निळ्या ड्रमची सध्या देशात दहशत आहे. सौरभ हत्याकांडानंतर अनेक पती घाबरल्याचे सोशल मीडियावरील चर्चा, वृत्त आणि रील्समधून समोर येत आहे. अनेक पतींनी हे निळे ड्रम घरातून बाहेर फेकले आहे. हे ड्रम पाणी भरण्यापासून धान्य ठेवण्यासाठी वापरात येतो. तर या सर्व घडामोडींवर बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांनी चिमटा काढला आहे. हे प्रकार पाहिल्यावर आपण लग्न केले नाही, हे बरं झालं असा चिमटा त्यांनी काढला. त्यांनी या हत्याकांडची निंदा केली.

औरंगजेब महान नाहीच

सध्या महाराष्ट्रातील औरंजेबाच्या कबरीचा विषय देशभर पसरला आहे. औरंगजेब हा महान नाहीच, अशी भूमिका बागेश्वर बाबाने जाहीर केली. तर राणा सांगा यांच्यावर टिप्पणी करणाऱ्यांवर त्यांनी हल्लाबोल केला. जे परदेशी आक्रमणकर्त्यांचे उदातीकरण करतात, त्यांच्या बुद्धीची शुद्धी झाली पाहिजे असे ते म्हणाले.

हिंदू राष्ट्र असेल कसे?

ते म्हणाले की हिंदुत्वाची क्रांती आवश्यक आहे. जातिवादामुळे देशाचे नुकसान होत असल्याचे ते म्हणाले. संपूर्ण देश एकत्र येणे गरजेच असल्याचे ते म्हणाले. हिंदू राष्ट्राची वकील त्यांनी यावेळी केली. हिंदूराष्ट्रात प्रत्येकाला त्याच्या धर्माचे पालन करण्याची मुभा असेल, असे ते म्हणाले. हिंदू राष्ट्रात गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळायला हवा, अशी मागणी त्यांनी केली.