फळांच्या जगातला आयफोन…, एका खरबूजच्या किमतीत चमकदार एसयूव्ही घरी आणाल, असं काय आहे फळात?

हे फळ फक्त त्याच्या गोडव्याने नाही तर, किंमतीमुळे देखील खास आहे... फळ श्रीमंत लोक एकमेकांना भेट वस्तू म्हणून देतात... फळाला का आहे इतकं महत्त्व कळल्यानंतर तुमच्याही भुवया उंचावतील...

फळांच्या जगातला आयफोन..., एका खरबूजच्या किमतीत चमकदार एसयूव्ही घरी आणाल, असं काय आहे फळात?
फाईल फोटो
| Updated on: Nov 10, 2025 | 11:45 AM

प्रत्येक फळाचं एक खास वैशिष्ट्य असतं… प्रत्येक आरोग्यासाठी लाभदायक असतो… पण तुम्ही एक असा खरबूज पाहिला आहे, ज्याची किंमत एका महागड्या कार एवढी असेल? तर असा एक खरबूज आहे, ज्याची किंमत एका आलिशान कार इतकी आहे… जपान येथे लागवड करण्यात येणारा फळ Yūbari King Melon (यूबारी किंग खरबूज) जगातील सर्वात महागडा खरबूज आहे… हे फळ फक्त त्याच्या गोडव्याने आणि सुगंधाने नाही तर, किंमतीमुळे देखील जगभरात चर्चेत आहे… जपान येथील होक्काइडो (Hokkaido) प्रांतातील छोटं शहर Yūbari येथे लागवड करण्यात येणाऱ्या या खरबूजच्या एका जोडीची किंमत 5 मिलियन येन म्हणजे 29 लाख रुपये आहे…

का इतकं महागडं आहे हे फळ?

साधारण दिसणारा खरबूज इतका महाग का असेल…? अशा प्रश्न तुमच्या मनात देखील नक्कीच आला असेल. Yūbari King Melon हा कोणता साधारण फळ नाही तर, या फळाची शेती खास प्रकारे केली जाती. फळाचा गोडवा, आकार किंवा चव कमी होऊ नये म्हणून प्रत्येक रोपावर फक्त एकच खरबूज लावलेा असतो.

फळाची लागवड पूर्णपणे हरितगृह नियंत्रित प्रणालीमध्ये केली जाते जिथे तापमान, आर्द्रता आणि प्रकाश पातळी अचूकपणे राखली जाते. म्हणूनच प्रत्येक फळाचा आकार पूर्णपणे गोल असतो आणि त्याच्या सालीवर नैसर्गिक जाळीसारखी रचना असते, ज्यामुळे ते इतर खरबूजांपेक्षा वेगळे दिसते.

जपानमध्ये फळ आदराचे प्रतीक

खरबूज जपान येथे कोणाला रॉयल गिफ्ट म्हणून दिलं जातं… जपान येथे कोणाल सन्मान द्यायचा असेल तर महागडा खरबूज भेट म्हणून दिला जातो. जपान मधील लोकांसाठी फळ सन्मानाचं प्रतीक आहे.. म्हणून या फळाची दरवर्षी निलामी होती आणि श्रीमंत लोकं हे फळ विकत घेण्यासाठी कोट्यवधींची रक्कम देखील मोजतात.

फळांच्या जगातील आयफोन…

खरबूज फक्त खाण्यासाठी नाही तर, एक शाही अनुभव देखील आहे… जगभरातील लोक खरबूज कमी पैशांत विकत घेतात, पण जपान मध्ये हे खरबूज घेणं म्हणजे सन्मानाची गोष्ट आहे … जपानच्या Yūbari King Melon खरबूजची किंमत ऐकल्यानंतर अनेक जण म्हणतात, वाह… खरबूज नाही… हे तर सोनं आहे…’ तर, अनेकांनी फळाची तुलना आयफोनशी केली आहे. एवढंच नाही तर, फळापेक्षा एक आलिशान एसयूव्ही विकत घेईल…