पदवी घ्यायला गेल्यावर स्टेजवर सगळ्यांसमोर स्टंट! शिक्षक, मान्यवरांना धक्का, व्हिडीओ व्हायरल!

कॉन्वोकेशन सेरेमनीत सन्मान म्हणून शिक्षक, कुलगुरूंकडून विद्यार्थ्यांना पदवी दिली जात असते. एक मुलगा स्टेजवर जातो आणि सोशल मीडियावर चालू असणारा ट्रेंड करतो.

पदवी घ्यायला गेल्यावर स्टेजवर सगळ्यांसमोर स्टंट! शिक्षक, मान्यवरांना धक्का, व्हिडीओ व्हायरल!
Viral Video Of Convocation Ceremony
Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 21, 2022 | 1:42 PM

कॉन्वोकेशन सेरेमनी (दीक्षांत समारंभात) चालू असताना आपण एकदम शांतीत जाऊन आपली पदवी घेतो. स्टेजवर सगळे मान्यवर असतात. आता इतक्या मोठ्या लोकांसमोर साहजिक आहे आपण नीट शिस्तीत जाणार आणि पदवीचं सर्टिफिकेट घेणार. हो की नाही? पण एक असा व्हिडीओ व्हायरल झालाय ज्यात या मुलानं कहर केलाय. व्हिडीओ बघून तुम्हालाही धक्का बसेल. एक ट्रेंड सुरु होता सोशल मीडियावर माहितेय का? कंबर धरून नाचायचा? तोच ट्रेंड या मुलानं चक्क पदवी घ्यायला गेल्यावर स्टेजवर सगळ्या मान्यवरांसमोर केलाय.

एका कॉलेजमध्ये कॉन्वोकेशन सेरेमनी चालू असते. कॉन्वोकेशन सेरेमनीत सन्मान म्हणून शिक्षक, कुलगुरूंकडून विद्यार्थ्यांना पदवी दिली जात असते. एक मुलगा स्टेजवर जातो आणि सोशल मीडियावर चालू असणारा ट्रेंड करतो.

सोशल मीडियावर चालणाऱ्या ट्रेंडिंग गाण्यावर विद्यार्थी हुक स्टेप्स दाखवू लागतो. मुलाचे मित्र काय अक्षरशः उपस्थित असणारे सगळेच विद्यार्थी, मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे आणि शिक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसतो.

दीक्षांत समारंभादरम्यान प्रमुख पाहुणे आणि कॉलेजचे प्रिन्सिपल विद्यार्थ्यांना डिग्री देत आहेत. या काळात माहिर मल्होत्रा नावाच्या विद्यार्थ्याला बोलावलं जातं. स्टेजवर चढताच तो इन्स्टाग्राम रिल्सवर व्हायरल होणाऱ्या ‘काला चष्मा’ या गाण्याची हूक स्टेप्स करतो.

इन्स्टाग्राम रिल्स

स्टेजवर अचानक हे पाहून सगळेच अवाक होतात. हा मुलगा काय करतोय, असा प्रश्न पडतो. मात्र प्रमुख पाहुणे व प्राचार्य हसत हसत पदवी देताना दिसतात. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.