AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | कशाचाही विचार न करता चिमुकला रस्त्यावर आला, भरधाव वेगात कार आली अन्…

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ तुम्हाला थक्क करणारा आहे. या व्हिडीओमध्ये कारचालकाच्या कुशलतेमुळे एक गंभीर अपघात टळला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगा बालंबाल बचावल्याचे आपल्याला दिसत आहे.

Video | कशाचाही विचार न करता चिमुकला रस्त्यावर आला, भरधाव वेगात कार आली अन्...
CAR ACCIDENT
| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 11:35 PM
Share

मुंबई : अपघातामुळे रोज शेकडो लोकांचा मृत्यू होतो. काही अपघात क्षुल्लक कारणामुळे होतात. तर काही अपघात एवढे भीषण असतात की, त्यांना आपण सहजासहजी विसरत नाही. अशाच काही अपघाताचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ तुम्हाला थक्क करणारा आहे. या व्हिडीओमध्ये कारचालकाच्या कुशलतेमुळे एक गंभीर अपघात टळला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगा बालंबाल बचावल्याचे आपल्याला दिसत आहे. (kid crossing road without seeing car terrible accident video went viral on social media)

छोटा मुलगा रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतोय 

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये जोरदार पाऊस बरसत असल्याचे आपल्याला दिसत आहे. पावसाची तीव्रता जास्त असल्यामुळे रस्त्यावर कोणीही दिसत नाहीये. या सामसूम रस्त्यावर एक छोटा मुलगा उभा आहे. हा मुलगा रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतोय. रस्त्यावर वाहनांची ये-जा सुरु असल्यामुळे हा मुलगा सुरुवातीला बाजूला थांबल्याचे आपल्याला दिसतेय. मात्र, काही सेकंदानंतर त्याने रस्ता ओलांडण्याचे ठऱवले आहे. कसलाही विचार न करता हा छोटा मुलगा रस्त्यावर आला आहे.

मुलगा दिसताच त्याने कार वळवली

सुरुवातीला रस्त्यावर वाहने दिसत नसली तरी, छोट्या मुलाने दोन पाऊल समोर टाकताच भरधाव वेगात एक कार आल्याचे आपल्याला दिसत आहे. काळ्या रंगाची ही कार अतिशय वेगात येत आहे. व्हिडीओतील कारचा मुलाला अंदाज न आल्यामुळे तो पुरता गोंधळला आहे. मात्र, भरधाव वेगात आलेल्या कारचालकाने अतिशय चाणाक्षणे आपले कारवरील नियंत्रण सुटू दिले नाही. मुलगा दिसताच त्याने कार वळवली आहे. तसेच मुलाला वाचवले आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

कारचालकाने मुलाचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:चा जीव पणाला लावल्यामुळे नेटकरी त्याचे कौतूक करत आहेत. तसेच हा व्हिडीओ पाहून आश्चर्यसुद्धा व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर तो काही क्षणांत व्हायरल झाला आहे. नेटकरी या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला jatt.life या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | लग्नमंडपात जाण्याआधी नवरीने केला नवरदेवाचा मेकअप, खास व्हिडीओ एकदा पाहाच

VIDEO | मै हू डॉन, राष्ट्रवादीतील मित्रांसोबत महेश लांडगेंचा डान्स, मैत्रीदिनी जुना व्हिडीओ व्हायरल

Video | नवरदेवाने नातेवाईकांसमोर तिला उचललं, नंतर केलं असं काही की नवरीला चेहरा लपवावा लागला, व्हिडीओ व्हायरल

(kid crossing road without seeing car terrible accident video went viral on social media

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.