VIDEO | मै हू डॉन, राष्ट्रवादीतील मित्रांसोबत महेश लांडगेंचा डान्स, मैत्रीदिनी जुना व्हिडीओ व्हायरल

जगभरात ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी फ्रेण्डशिप डे साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने महेश लांडगे यांनी मित्रांसोबत केलेल्या डान्सचा व्हिडीओ पुन्हा शेअर केला जात आहे.

VIDEO | मै हू डॉन, राष्ट्रवादीतील मित्रांसोबत महेश लांडगेंचा डान्स, मैत्रीदिनी जुना व्हिडीओ व्हायरल
महेश लांडगेंचा डान्स व्हिडीओ व्हायरल

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘मै हू डॉन’ या गाण्यावर लांडगे यांनी केलेल्या डान्सचा जुना व्हिडीओ पुन्हा लक्ष वेधून घेत आहे. रविवारी झालेल्या मैत्री दिनाचं औचित्य साधत समर्थकांनी आमदार महेश लांडगे यांनी राजकारणातील मित्रांसोबत केलेल्या डान्सचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा शेअर केला.

महेश लांडगेंचा जुना डान्स व्हिडीओ

जगभरात ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी फ्रेण्डशिप डे साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने महेश लांडगे यांनी मित्रांसोबत केलेल्या डान्सचा व्हिडीओ पुन्हा शेअर केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पिंपरी चिंचवडमधील माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी या डान्समध्ये लांडगे यांना साथ दिली होती. मै हू डॉन, बडे मियां छोटे मियां यासारख्या गाण्यांवर त्यांनी ग्रुप डान्स केला. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र जुना व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ :

कोण आहेत महेश लांडगे?

महेश लांडगे भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष
भोसरी विधानसभा मतदारसंघातून आमदारकी
पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राजकारणाला सुरुवात
2017 मध्ये राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश
राजकारणापूर्वी पैलवान म्हणून महेश लांडगे यांची ओळख

भंडारा उधळत आमदार लांडगेंचा डान्स

याआधीही, आमदार महेश लांडगे यांचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाला होता. महेश लांडगेंची कन्या साक्षी लांडगे यांचे 6 जून रोजी लग्न झाले. लग्नातील मांडव टहाळ कार्यक्रमाच्या वेळी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत महेश लांडगे बेफाम होऊन नृत्य करताना दिसले होते. समर्थकांच्या खांद्यावर बसून लांडगेंनी नृत्याचा आनंद लुटला होता.

संबंधित बातम्या :

VIDEO | लेकीच्या मांडव टहाळीला भाजप आमदाराचा डान्स, भंडारा उधळत पुण्यात महेश लांडगेंचे बेफाम नृत्य

व्हॅलेंटाईनच्या दिवशी अमृता फडणवीसांचं नवं गाणं, आमदार महेश लांडगे म्हणतात, ‘नाईस व्हॉइस…!’

(Pune Pimpri Chinchwad Bhosari BJP MLA Mahesh Landge Dances on Main Hoon Don Song Old Video Viral)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI