AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | लेकीच्या मांडव टहाळीला भाजप आमदाराचा डान्स, भंडारा उधळत पुण्यात महेश लांडगेंचे बेफाम नृत्य

कन्या साक्षी लांडगे यांच्या विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित विधींच्या वेळी लांडगेंनी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत नृत्य केले ( BJP MLA Mahesh landge Dance)

VIDEO | लेकीच्या मांडव टहाळीला भाजप आमदाराचा डान्स, भंडारा उधळत पुण्यात महेश लांडगेंचे बेफाम नृत्य
लेकीच्या लग्न विधींवेळी महेश लांडगे यांचा डान्स
| Updated on: May 31, 2021 | 10:45 AM
Share

पिंपरी चिंचवड : भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे (Mahesh landge ) बेफाम नाचतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. कन्या साक्षी लांडगे यांच्या विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित विधींच्या वेळी लांडगेंनी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत नृत्य केले. मात्र यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न केल्यामुळे टीका होत आहे. (Pune Pimpri Chinchwad BJP MLA Mahesh landge Dance in Daughter Sakshi Landge Wedding)

भंडारा उधळत आमदार लांडगेंचा डान्स

भाजप आमदार महेश लांडगे यांची मुलगी साक्षी लांडगे यांचे येत्या 6 जून रोजी लग्न आहे. या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. लग्नातील मांडव टहाळ कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यावेळी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत आमदार लांडगे बेफाम होऊन नृत्य करताना दिसले. समर्थकांच्या खांद्यावर बसून लांडगेंनी नृत्याचा आनंद लुटला.

कोरोना नियमांच्या पायमल्लीवरुन टीका

दरम्यान, या कार्यक्रमात आमदारांनी भंडारा उधळत कोरोनासंबंधी सर्व नियम पायदळी तुडवल्याने टीका होत आहे. या सोहळ्यात काही अपवाद वगळता आमदारांसह अनेक जण विनामास्क वावरत असताना व्हिडीओत दिसत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्यामुळे कारवाई होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

कोण आहेत महेश लांडगे?

महेश लांडगे भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष भोसरी विधानसभा मतदारसंघातून आमदारकी पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राजकारणाला सुरुवात 2017 मध्ये राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश राजकारणापूर्वी पैलवान म्हणून महेश लांडगे यांची ओळख ( BJP MLA Mahesh landge Dance)

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

जगताप-लांडगे टेन्शनमध्ये, शेवटच्या 10 मिनिटात पिंपरीत भाजपचा महापौरपदाचा अर्ज

व्हॅलेंटाईनच्या दिवशी अमृता फडणवीसांचं नवं गाणं, आमदार महेश लांडगे म्हणतात, ‘नाईस व्हॉइस…!’

(Pune Pimpri Chinchwad BJP MLA Mahesh landge Dance in Daughter Sakshi Landge Wedding)

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.