सगळ्यांचा लाडका सोशल मीडिया स्टार Kili Paul! व्हिडीओ व्हायरल

किली पॉलने हा व्हिडिओ आपल्या घरी बनवलाय. तो पोस्ट करताच तो व्हायरल झालाय.

सगळ्यांचा लाडका सोशल मीडिया स्टार Kili Paul! व्हिडीओ व्हायरल
kili paul
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 30, 2022 | 4:21 PM

टांझानियाचा सोशल मीडिया सुपरस्टार किली पॉलचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो स्वतःच्या आवाजात बॉलिवूड गाणं गाताना दिसत आहे. कायली पॉल पहिल्यांदाच स्वतःच्या आवाजात गाणं गातोय. याआधी त्याचे जे व्हिडिओ समोर आले आहेत, त्यात तो बॉलिवूडच्या गाण्यांवर लिप सिंक करताना दिसलाय.

याच कारणामुळे लोकांना त्याच्या आवाजात गायलेलं गाणं ऐकावंसं वाटलं. हा व्हिडिओ पोस्ट करताना किली पॉलने कॅप्शनमध्ये लिहिले की, जर तुम्हाला लोकांना माझ्या आवाज आणखी ऐकायचा असेल तर मला सांगा.

किली पॉलने हा व्हिडिओ आपल्या घरी बनवलाय. तो पोस्ट करताच तो व्हायरल झालाय. या व्हिडिओत किली पॉलने शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांच्या ‘रब ने बना दी’ या गाजलेल्या चित्रपटातील ‘तुझ में रब दिखता है’ हे गाणं गायलं आहे.

त्याच्या व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये लहान मुलं दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी गाण्याचे बोल अचूक उच्चारण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय.

सध्या त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

किली पॉलचे जगभरात अनेक चाहते आहेत. तो गाण्यांच्या लिप सिंकमुळे हिंदी भारतात खूप प्रसिद्ध आहे. याआधीही तो भारतात येऊन अनेक रिॲलिटी शोमध्ये सहभागी झालाय.