Video : मायनस 10 अंश तापमान, हाडं गोठावणारी थंडी अन् वीजेच्या खांबावर लटकून काम! वीज कर्माचाऱ्यांचा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

हाडं गोठवणारी थंडी, बोचणारे वारे, पण सर्वांना वीज मिळावी म्हणून आपले प्राण धोक्यात टाकून कडाक्याच्या थंडीतही लाईट व्यवस्थेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी त्यांच्या या मेहनतीला सलाम करत आहेत.

Video : मायनस 10 अंश तापमान, हाडं गोठावणारी थंडी अन् वीजेच्या खांबावर लटकून काम! वीज कर्माचाऱ्यांचा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क
VIRAL VIDEO
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 06, 2026 | 6:09 PM

राज्यात गुलाबी थंडीची चाहूल ही सकाळी लागू लागली आहे. पण उत्तरेत कडाक्याच्या थंडीला सुरूवात झाली आहे. हिमवर्षाव व्हायला सुरूवात झाली आहे. पडणाऱ्या गारांमुळे अनेक अडचणी निर्माण होतात खास करून वीजेच्या.काही वेळेस वीजेच्या तारांवर किंवा खांबावर मोठा हिमखडा पडला तर वीज पुरवठा होत नाही. कडाक्याची थंडी त्यात घरात लाईट नाही अशी परिस्थिती निर्माण होते. लडाखमधील अस एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वीज कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून वीज व्यवस्था सुरळित करताना दिसत आहेत.

 

 

लडाखमधील सियाचिन आणि नुब्रा खोऱ्यासारख्या दुर्गम भागांमध्ये वीज पोहोचवणं हे सोपं काम नाही. इथं हिवाळ्यात तापमान प्रचंड खाली जातं. मिळालेल्या माहितीनुसार व्हिडिओमध्ये तापमान -30 अंश आहे. आजूबाजूला बर्फे बोचरे वारे आणि कठीण परिस्थिती असताना देखील वीज कर्मचारी काम करताना त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

लडाखच्या दुर्गम भागांमध्ये वीजेची सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी वीज विभागाकडून काम सुरू आहे. लडाख पॉवर डेव्हलपमेंट डिपार्टमेंट,रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने हे काम केले जात आहे. नुब्रा खोरे आणि सियाचिन परिसरातील दूरवरच्या वस्त्यांपर्यंत वीज पोहोचवणे आणि वीजपुरवठ्याची सुविधा अधिक सक्षम करणं हा यामागचा उद्देश आहे.

या कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या मेहनतीचं कौतुक आहे. बर्फवृष्टी आणि जीवघेण्या थंडीतही आपलं काम सुरू ठेवणाऱ्या या कर्मचाऱ्यांना नेटकऱ्यांनी सलाम केला आहे. एक यूजर म्हणतोय, ‘आम्ही घरात हिटर लावून बसलोय आणि हे हिरो स्वत: इतकी थंडी झेलून आम्हाला वीज पुरवत आहेत. तर दुसर्‍या यूजरने त्यांना मनापासून आभार मानले आहेत. त्यातच तिसऱ्या यूजरने ही फक्त नोकरी नाही तर देशभक्तीचे एक मूर्तिमंत उदाहरण आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us