सर, शाळेत वडापाव स्टॉल सुरु करु द्या, विद्यार्थ्याच्या विनंतीवर IAS तुकाराम मुंढे प्रेमाने जे म्हणाले,ऐकून प्रत्येकजण हैराण

FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे आणि शाळकरी मुलाचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओला खूप पसंद केले जात आहे. शाळकरी मुलाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

सर, शाळेत वडापाव स्टॉल सुरु करु द्या, विद्यार्थ्याच्या विनंतीवर IAS तुकाराम मुंढे प्रेमाने जे म्हणाले,ऐकून प्रत्येकजण हैराण
TUKARAM MUNDHE AND SCHOOL BOY VIRAL VIDEO
| Updated on: Oct 12, 2026 | 8:39 PM

Tukaram Mundhe Viral Video: महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA)आयुक्त तुकाराम मुंढे आणि एका शालेय विद्यार्थ्याचा चांगलाच व्हायरल झाला आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील शाळांमध्ये वडा पाव विक्रीस बंदी घातल्याचा निर्णय अलिकडे तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे. या संदर्भात एका कार्यक्रमात एका विद्यार्थ्याने मुंढे यांना विनंती केली की त्याच्या वर्गमित्रांनी वडापावच्या स्टॉलला सुरु करण्याची विनंती तुम्हाला करायला सांगितले आहे. यावर आयएएस तुकाराम मुंढे यांनी जे उत्तर दिले ते प्रचंड व्हायरल होत आहे.

FDA आयुक्त तुकाराम मुंढे आणि एका शालेय विद्यार्थ्याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. एका शालेय विद्यार्थ्यांने मुंढे सरांना सांगितले की मित्रांनी तुम्हाला शाळेतील वडापावच्या स्टॉल सुरु करण्याची विनंती करायला सांगितले आहे. यामुळे माझ्या मित्रांना वडापाव खायला मिळेल असेही हा बालक त्यांना म्हणाला. त्यामुळे ही शाळातील बंद झालेले स्टॉल उघडण्याची विनंती आपल्याला केली आहे.

Loading...

 तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्याला काय दिले उत्तर

लहान शाळकरी मुलाच्या अवखळ प्रश्नाला उत्तर देताना या मुलाला प्रेमाने सकस आहाराचे महत्व सांगितले. यानंतर आता सोशल मीडियावर याची चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा तेव्हा सुरु झाली जेव्हा महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने लहान मुलांना हेल्दी खाण्याची सवय लागावी म्हणून शाळात आणि शाळांच्या ५० मीटर भागात जंक फूड विकण्यास, वितरण आणि जाहीरात करण्यास बंदी घातली आहे.
या बंदीमुळे वडा पाव, समोसे, डीप-फ्राईड चीजे, चिप्स, कोल्ड ड्रिंक्स, गोड ड्रिंक्स, चॉकलेट आणि आइसक्रीम सारख्या स्नॅक्सचा समावेश आहे. जे मुलांना प्रचंड प्रसिद्ध असतात. हा आदेश संपूर्ण महाराष्ट्रात शाळांवर लागू करण्यात आला आहे. आणि यामुळे दोन कोटींहून अधिक लोकांवर चांगला परिणाम होण्याची शक्यता आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

या दरम्यान, ‘इंद्रनील अनासपुरे’ याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मुलाचा आणि मुंढे यांच्या दरम्यान झालेल्या चर्चेचा हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. या क्लिपमध्ये मुलाने मुंढे सरांना सांगितले की त्याच्या मित्रांनी शाळांतील वडापावचे स्टॉल सुरु करण्यास विनंती केली असल्याचे त्याने म्हटले आहे.

मुलाने विचारले की जर त्यांनी तुम्हाला विचारले तर तुम्ही त्यांना काय सांगाल ? याला उत्तर देताना मुंढे यांनी मुलांना पौष्टीक आणि सकस आहार खाण्याचा सल्ला दिला आणि पुढे म्हणाले की चांगले अन्न खा, यामुळे तुमचे शरीर आणि मेंदू स्वस्थ राहील, सकस आहार खा. चायनीजमध्ये हानीकारक रंग असतात.  ते पुढे म्हणाले की तेल आणि फॅट वाले भलेही चवीला चांगले लागत असते. परंतू ते आरोग्यावर एकदम वाईट परिणाम टाकू शकते.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us