Video | शिकलेल्या सिंहाची सोशल मीडियावर चर्चा, निघाला सुलभ शौचालयातून बाहेर, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर रोजच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये काही व्हिडीओ हे प्राण्याचे असतात. सध्या तर एक अतिशय थरारक आणि तेवढाच मजेदार व्हिडीओ चर्चेचा विषय ठरलाय.

Video | शिकलेल्या सिंहाची सोशल मीडियावर चर्चा, निघाला सुलभ शौचालयातून बाहेर, व्हिडीओ व्हायरल
lion viral video

मुंबई : सोशल मीडियावर रोजच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये काही व्हिडीओ हे प्राण्याचे असतात. सध्या तर एक अतिशय थरारक आणि तेवढाच मजेदार व्हिडीओ चर्चेचा विषय ठरलाय. या व्हिडीओमध्ये एक सिंह चक्क पुरुषांच्या शौचालयामधून बाहेर पडला आला. शौचालयातून बाहेर पडल्यामुळे नेटकरी हा व्हिडीओ आवडीने पाहत असून यावर भन्नाट कमेंट्स करत आहेत.

सिंह शौचालयातून बाहेर आला

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ एका जंगलातील असल्याचे दिसत आहे. जंगलामध्ये पर्यटकांना शौचास जाण्यासाठी एक खास शौचालय बांधण्यात आले आहे. या शौचालयाजवळ काही पर्यटक आले आहेत. मात्र, यामधून थेट जंगलाचा राजा बाहेर आला आहे. पुरुषांच्या शौचालयातून जंगलाचा राजा सिंह आल्यामुळे पर्यटक अवाक् झाले आहेत. हा प्रसंग समोर येताच पर्यटकांनी व्हिडीओ शूटिंग करुन सिंहाच्या सर्व हालचाली कैद केल्या आहेत. व्हिडीओतील सिंहाचा थाट आणि रुबाबदारपणा पाहण्यासारखा आहे.

नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. सुलभ शौचालयाच्या माध्यमातून संपूर्ण देशात स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले जात आहे. शौचालयाचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येतंय. या पार्श्ववभूमीवर सिंह म्हणजेच एक प्राणी पुरुषांच्या शौचालयातून बाहेर आल्यामुळे नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यायंत. प्राण्यांनासुद्धा कोठे शौचास जावे हे समजत आहे, असे एका नेटकऱ्याने म्हटलंय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला नेटकरी मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर करत आहेत. सध्या हा व्हिडीओ वाइल्डलेंस इको फाउंडेशन या खासगी संस्थेने ट्विटवर शेअर केला आहे.

इतर बातम्या :

Video: लग्नाआधी मिशीला ताव, बायको समोर येताच नवऱ्याचं झालं मांजर, लग्नसोहळ्याचा व्हिडीओ व्हायरल

बॉयफ्रेण्ड रोज मागवायचा मुलींचे कपडे, गर्लफ्रेण्डच्या शोधाशोधीनंतर धक्कादायक सत्य उजेडात

भूतांच्या अफवांनी आलिशान महालाची वाट, ब्रिटनमधला या महालाजवळ जाण्याची आजही कुणाची हिंमत नाही

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI