Video: तब्बल 3 वर्षांनी सरप्राईज भेट, मित्राला रडू आवरेना, नेटकरी म्हणाले, ‘आम्हालाही आमच्या मित्रांची आठवण आली’

स्टीव्हने पाहिले की त्याचा मित्र कारमध्ये आहे, तो त्याला पाहून रडू लागतो

Video: तब्बल 3 वर्षांनी सरप्राईज भेट, मित्राला रडू आवरेना, नेटकरी म्हणाले, 'आम्हालाही आमच्या मित्रांची आठवण आली'
मैत्रीचं महत्त्व सांगणारा हा व्हिडीओ आहे.

सोशल मीडियावर पोस्ट केलेले काही व्हिडीओ आपल्याला पोट धरुन हसवतात तर काही व्हिडीओ हृदयाला स्पर्श करतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. तुम्हालाही तो पाहून आनंद होईल. मैत्रीचं महत्त्व सांगणारा हा व्हिडीओ आहे. म्हणूनच हा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. ( boy-breaks-into-tears-upon-seeing-his-best-friend-after-long-time )

@GoodNewsCorres1 ने हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्याने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सांगितलं की, स्टीव्ह आणि ओवेन 3 वर्षांपूर्वी वेगळे झाले होते. ओवेन मिसौरीला जात होता, अलीकडेच स्टीव्हचा शाळेतील दिवस वाईट होता. त्यामुळे त्याने पालकांना लवकर घरी घेऊन जाण्यासाठी सांगितलं. खरं तर, त्याला माहित नव्हतं की त्याचा मित्र ओवेन शिकागोहून त्याला भेटायला येत आहे. जेव्हा गाडी त्याला घ्यायला आली, तेव्हा स्टीव्हला आश्चर्याचा धक्का बसला.

येथे व्हिडिओ पहा-

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्टीव्हने पाहिले की त्याचा मित्र कारमध्ये आहे, तो त्याला पाहून रडू लागतो, तेव्हा त्याचा मित्र त्याचं सांत्वन करतो, त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच लोकांनीही आपल्या कमेंट्स करायला सुरुवात केली. एका युजरने लिहलं, यालाच खरी मैत्री म्हणतात.

व्हिडिओ पाहून काही लोक भावूक झाले, तर काही लोकांना त्यांच्या मित्रांची आठवण झाली. त्यांना भेटून खूप दिवस झाल्याचंही नेटकरी या व्हिडीओखाली लिहित आहेत. काही लोक त्यांच्या मित्रांना कमेंटबॉक्समध्ये टॅग करत आहेत. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. हेच कारण आहे की बर्‍याच लोकांनी ते त्यांच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शेअर केले आहे. बातमी लिहीपर्यंत या व्हिडिओला 17 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

 

हेही पाहा:

Video: जगातील पहिली मांजर शेफ, भन्नाट रेसिपी पाहून चांगले चांगले गार, नेटकरी म्हणाले, ‘बाई, तूच काय ती सुगरण!’

फेसबुक, इन्स्टा अन् WhatsApp डाऊन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI