बॉयफ्रेण्ड रोज मागवायचा मुलींचे कपडे, गर्लफ्रेण्डच्या शोधाशोधीनंतर धक्कादायक सत्य उजेडात

तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडच्या फोनवर आलेला एक मेसेज पाहून संशय घेण्यास सुरुवात केली. तो अनेकदा मुलींच्या कपड्यांची ऑनलाइन खरेदी करत असे, मात्र त्याने ते कपडे आपल्या मैत्रिणीला कधीच दिले नव्हते. जेव्हा मुलीने सुरुवातीला त्याच्याशी याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने टाळत विषय बदलला.

बॉयफ्रेण्ड रोज मागवायचा मुलींचे कपडे, गर्लफ्रेण्डच्या शोधाशोधीनंतर धक्कादायक सत्य उजेडात
प्रातिनिधीक फोटो
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Oct 05, 2021 | 1:53 PM

मुंबई : जर रिलेशनशीपमध्ये प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता असेल, तर ते नाते दीर्घकाळ टिकते, परंतु त्यात फसवणूक होताच नाजूक नात्याला तडा जातो. असाच प्रकार एका तरुणीसोबत घडला, जिला जाणीवही नव्हती की तिचा बॉयफ्रेंड वारंवार मुलींचे कपडे मागवत होता, कारण ते तिच्यापर्यंत पोहोचतच नव्हते. ही गोष्ट समजल्यावर तिने सत्य जाणून घेतले, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

मुलींच्या कपड्याची ऑनलाईन ऑर्डर

काही जण उघडपणे आपल्या जोडीदाराची फसवणूक करतात, तर काही जण गुप्तपणे त्यांच्या नात्यात धोकेबाजी करत राहतात. या तरुणीच्या बाबतीतही असेच काहीसे घडत होते. तिचा बॉयफ्रेंड सतत मुलींच्या कपड्यांची ऑर्डर देत होता, पण त्याने आपल्या गर्लफ्रेण्डला यापैकी एकही कपडा कधीही गिफ्ट केला नव्हता. तरुणीने ही संपूर्ण गोष्ट रेडइट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितली आहे, की तिने आपल्या बॉयफ्रेंडची फसवणूक कशी उघड केली.

गर्लफ्रेण्डपर्यंत कपडेच पोहोचले नाहीत

द सनच्या वृत्तानुसार, तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडच्या फोनवर आलेला एक मेसेज पाहून संशय घेण्यास सुरुवात केली. तो अनेकदा मुलींच्या कपड्यांची ऑनलाइन खरेदी करत असे, मात्र त्याने ते कपडे आपल्या मैत्रिणीला कधीच दिले नव्हते. जेव्हा मुलीने सुरुवातीला त्याच्याशी याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने टाळत विषय बदलला.

परस्पर तिसऱ्या पत्त्यावर कपडे पाठवले

अखेरीस, जेव्हा मुलीने तिच्या प्रियकराच्या ईमेलवर कपड्यांच्या ब्रँडचा मेल पाहिला, तेव्हा तिला प्रियकरावर संशय येऊ लागला. मुलीला अजूनही विश्वास बसत नव्हता की, तिचा जोडीदार हे कपडे कोणाला पाठवत आहे? आधी तो स्वतः कपडे मागवत असे आणि नंतर ते थेट कोणत्यातरी पत्त्यावर पोहोचवायला सांगत असे.

मॅनेजरचा पत्ता देण्यास नकार

जेव्हा तरुणीला तिच्या जोडीदाराच्या कृत्याबद्दल संशय आला, तेव्हा तिने संबंधित कपड्यांच्या ब्रँडच्या दुकानातूनच शोध लावायचे ठरवले. तिने स्टोअरच्या मॅनेजरला विचारले की तिचा बॉयफ्रेंड सतत येथून कपड्यांची ऑर्डर देतो, पण तिला हे कपडे मिळत नाहीत, म्हणून तिला हे जाणून घ्यायचे आहे की ते कोणत्या पत्त्यावर दिले जात आहेत? व्यवस्थापकाने गोपनीयतेचा हवाला देत पत्ता सांगितला नाही, परंतु प्राप्तकर्त्याचे पहिले नाव सांगितले

अखेर तरुणीला तिचं नाव समजलं

नाव ऐकल्यावर मुलीला हे कळायला वेळ लागला नाही की तिची सर्वात चांगली मैत्रीण अर्थात बेस्ट फ्रेण्ड आणि तिचा जोडीदार रिलेशनशिपमध्ये आहेत आणि हे कपडे तिला दिले जातात. आतापर्यंत महिलेचा हा व्हिडीओ 40 लाख वेळा पाहिला गेला असून नेटिझन्स तरुणीबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या :

बॉसची बोलणी खाऊन मस्तकात आग, घरी जाऊन मित्रांच्या डोक्यात बॅट घातली, दुहेरी हत्येनंतर म्हणतो…

ड्रग्ज प्रकरणात अटकेनंतरही पालकांकडून पोरांचे लाड, बर्गर घेऊन आई NCB ऑफिसबाहेर

शाळा उघडताच मुख्याध्यापकाची वासना चाळवली, चंद्रपुरात पाचवीतील मुलीचा विनयभंग

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें