Video : ‘या’ पक्ष्यांना पाहून तुम्हीही म्हणाल, ‘ही बटालियन आहे की संपूर्ण सेना!’

कधी-कधी असे काही व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होतात, ज्यामुळे मन प्रसन्न होतं. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पक्ष्यांचं कळप सैन्याची परेड असल्यासारखं रस्त्यावरून कूच करत आहे. असे व्हिडिओ मन मोहून टाकतात. हा व्हिडिओही असाच आहे.

Video : या पक्ष्यांना पाहून तुम्हीही म्हणाल, ही बटालियन आहे की संपूर्ण सेना!
रस्ता ओलांडताना पक्ष्यांचा थवा
| Updated on: Jan 31, 2022 | 6:08 PM

Birds Video : सोशल मीडियावर दररोज सर्व प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही खूप मजेदार तर काही थोडेसे भावनिक व्हिडिओ आहेत, जे पाहून डोळ्यात पाणी तरळतं. यामध्ये विविध प्रकारच्या प्राण्यांच्या व्हिडिओंचाही समावेश आहे. सिंह, वाघापासून ते घोडे, हत्ती, कुत्रे, मांजर अशा सर्व प्रकारच्या प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. कधी-कधी असे काही व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होतात, ज्यामुळे मन प्रसन्न होतं. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पक्ष्यांचं कळप सैन्याची परेड असल्यासारखं रस्त्यावरून कूच करत आहे. असे व्हिडिओ मन मोहून टाकतात आणि हा व्हिडिओ देखील असाच आहे. व्हिडिओतल्या या वेगळेपणामुळे तो प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही तो आवडेल, मन प्रसन्न होईल.

बदकासारखा दिसतो कळप

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या पक्ष्यांमुळे वाहने रस्त्यावर थांबून एक व्यक्ती त्या पक्ष्यांना पुढे जाण्यासाठी चालवत असल्याचं दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला पक्षी कमी असल्याचं दिसत असलं तरी कॅमेरा थोडा मागे गेल्यावर एक आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळतं. मागून पक्षांचं मोठं कळप रस्ता ओलांडताना दिसतं. पक्ष्यांचा हा कळप पाहण्यास बदकासारखा दिसतो. रस्त्यावर असं दृश्य तुम्ही क्वचितच पाहिलं असेल.

ट्विटरवर शेअर

रस्त्यावरील पक्ष्यांची ही कूच पाहून लष्कराच्या जवानांनाही आश्चर्य वाटावं. हा अप्रतिम आणि मजेदार व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे आणि ‘मार्चिंग ऑफ लिटिल बर्ड बटालियन’ असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

‘पक्ष्यांची ही परेड मंत्रमुग्ध करणारी आहे’

28 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 15 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 1200हून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केलं आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरनं गंमतीत लिहिलं, की ही बटालियन आहे की संपूर्ण आर्मी, तर दुसऱ्या यूझरनं ‘पक्ष्यांची ही परेड मंत्रमुग्ध करणारी आहे’ अशी कमेंट केली आहे.

Latest Viral video : पक्ष्यांचा थवा समुद्रावर घालत होता घिरट्या, अचानक भला मोठा व्हेल आला पाण्याबाहेर आणि…

Nature Video Viral : खारूताईचा रुद्रावतार, घेतला असा काही चावा, की सरडा कोमात!

Chicken fly Viral Video : हवेत ‘अशी’ लांब आणि उंच उडणारी कोंबडी कधी पाहिली नसेल