Video: विमानात बसलेल्या मुलीला जेव्हा वडील पायलटच्या गणवेशात दिसतात, तेव्हा तिचा आनंद पाहण्यासारखा!

एक लहान मुलगी फ्लाइटमध्ये बसली आहे आणि ती समोर बघत आहे. तेवढ्यात पायलटच्या ड्रेसमध्ये तिच्या वडिलांची एंट्री होते, आणि मुलगी आनंदीत होते, ती तिच्या वडिलांना आवाज द्यायला लागते.

Video: विमानात बसलेल्या मुलीला जेव्हा वडील पायलटच्या गणवेशात दिसतात, तेव्हा तिचा आनंद पाहण्यासारखा!
विमानात बसलेली मुलगी जेव्हा वडिलांना बघते
| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 10:32 AM

इंटरनेटच्या जगात असे काही गोंडस व्हिडिओ रोज व्हायरल होतात, जे पाहून प्रत्येकाचे मन प्रसन्न होतं. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक लहान मुलगी फ्लाइटमध्ये बसली आहे आणि ती समोर बघत आहे. तेवढ्यात पायलटच्या ड्रेसमध्ये तिच्या वडिलांची एंट्री होते, आणि मुलगी आनंदीत होते, ती तिच्या वडिलांना आवाज द्यायला लागते. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालत आहे. ( Little girl sees her pilot dad on the same flight her cute reaction viral on social media)

या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक मुलगी तिच्या हातात तिकीट घेऊन सीटवर बसली आहे. पण अचानक ती मुलगी तिच्या सीटवरून उठते आणि हसायला लागते. मुलीला खूप आनंदी पाहून तिची आई सुद्धा हसायला लागते. मुलीच्या खूप जोरात हसण्याचं कारण तिचे वडील आहेत. मुलीचे वडील याच विमानाचे पायलट आहेत, त्यामुळे मुलगी त्यांना पाहून आनंदाने उड्या मारते.

व्हिडीओ पाहा:

विमानात वडिलांना पाहून मुलगी आनंदाने उडी मारते. एवढेच नाही तर ती त्याला पापा-पापा म्हणू लागते. दुसऱ्या बाजूला वडिलांनीही हात हलवून मुलीला शुभेच्छा दिल्या. तसे, हा व्हिडिओ बघून असे दिसते की हा व्हिडिओ मुलीच्या आईने शूट केला आहे. कारण, व्हिडीओत या आईचा आवाजही येत आहे, जी मुलीशी बोलत आहे. एका युजरने लिहलं, हा व्हिडीओ पाहून माझा दिवस चांगला झाला.

हा व्हिडिओ पोस्ट करताच, तो लगेच व्हायरल झाला. अनेकांना हा व्हिडीओ खूप आवडला. लोक यावर खूप प्रतिक्रीया देत आहे. आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लाइक्स व्हिडीओला मिळाल्या आहेत. हा व्हिडिओ shanaya_motiharने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही पाहा:

Video: विमानात लोकल ट्रेनचा माहौल, महिलेच्या गाण्यावर प्रवाशांचा जल्लोष, व्हिडीओ व्हायरल

Video: बकरीच्या पिलासोबतचा सेल्फी व्हिडीओ बनवत होता, तितक्यात बकरीच्या पिलाने जे केलं, त्याने लोक लोटपोट झाले!