
वॉशिंगटन: केस कापण्यासाठी आपल्याला हेअर कटींग सलूनमध्ये जाऊन बसावे लागते. तेथे केश कर्तनकार आपल्याला हवे तसे केस कापून देत असतो. परंतू सोशल मीडियावर एका अशा मशिनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात एक मशीन स्वत: झटपट केस कापत आहे. अनेकांना हा स्वयंचलित केस कापण्याचा व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटत आहे. परंतू या मागचे सत्य काय आहे.
स्वयंचलितपणे केस कापण्याच्या मशीनची पोस्ट इंस्टाग्रामवर Axe Drop x AI ने शेअर केली आहे. हे पेज AI सामुग्री पोस्ट करण्यासाठी ओळखले जाते. व्हिडीओ क्लीपमध्ये नॉर्वेच्या ओस्लोच्या रस्त्यावर स्वयंचलित मशीन लागलेली दिसत आहे. व्हिडीओ लांब केसांचा एक मनुष्य मशीनला टेपर फेड कटचा आदेश देतो. मशीन त्याला त्याचे डोके आत घालायला सांगते. आणि काय आश्चर्य काही मिनिटांत त्या मनुष्याला नवा हेअरस्टाईल मिळतो.
व्हिडीओत एक आणखी मनुष्य मशीनच्या जवळ जातो आणि काही निर्देशानंतर त्याला एक नवा हेअरकट मिळतो. या पोस्टवर युजर्नने कमेंट केली आहे की आता केस कापण्यासाठी तास् तास वाट पाहण्याची काही गरज नाही. तर एका युजरने चिंता व्यक्त करत लिहीले की जर डोके आत घातले आणि समजा मशिन नादुरुस्त झाली तर काय होईल !
येथे पाहा व्हिडीओ –
व्हिडीओच्या व्हायरल झाल्यानंतर हा प्रश्न देखील विचारला गेला की हा व्हिडीओ असली आहे की नकली. नंतर कळले की हा व्हिडीओ AI चे तंत्र वापरुन जनरेट केला आहे. एआयचा वापर केल्याचे समोर आल्यानंतरही अनेकांना प्रतिक्रीया देणे जारी ठेवले आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या क्लीपला हजारो लाईक मिळाले आहे. भविष्यातील विज्ञान एआयद्वारे दर्शवण्याचा हा प्रयत्न अनेकांना आवडला आहे.