जोरात शिंक आली असता रोखली, अन् साक्षात मृत्यूलाच पाहिले, जगातील पहिलीच केस
अनेकदा आपण नैसर्गिक आवेग रोखत असतो. आपल्याला चारचौघांवर शिंकणे,खोकणे यात कमीपणा वाटत असतो. परंतू एक शिंक रोखणेही जीवघेणे साबित होऊ शकते अशी घटना घडली आहे.

अनेकदा आपण आपल्या जीवनातील नैसर्गिक गोष्टींना हलक्यात घेतो आणि ते महागात पडत असते. उदाहरणार्थ आपण शिंक येत असेल तर आजूबाजूला लोक असल्यास शिकांना रोखण्याचा प्रयत्न करतो. परंतू कोणताही नैसर्गिक आवेग रोखणे किती धोकादायक असते हे दाखवणारी घटना घडली आहे. एका व्यक्तीने शिंक आली असता ती रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्याला ते प्रचंड महागात पडले. कारण त्यात त्याचा मृत्यू होई शकला असता असे म्हटले जात आहे.
एका ब्रिटीश व्यक्तीचा शिंक आल्याने ती रोखल्याने त्याचे प्राण संकटात सापडल्याचे उघडकीस आले आहे. हा व्यक्ती ड्रायव्हींग करत होता. त्यावेळी त्याने शिंक रोखल्याने त्याच्या गळ्याला छीद्र पडले. हवा फुप्फुसात कोंडल्याने असे झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या व्यक्तीचे कदाचित या प्राण जाऊ शकले असते म्हटले जात आहे. ही जगातील पहिली केस आहे ज्यात आलेली शिंक रोखल्याने एखाद्या व्यक्तीच्या अन्ननलिकेला छीद्र पडले. या संदर्भात BMJ Case Reports मध्ये बातमी प्रसिद्ध झाली आहे. चला तर वाचूयात हा खतरनाक अपघात कसा घडला ? सायन्स आणि डॉक्टर्स यांनी या संदर्भात काय सावधानतेचा इशारा दिला आहे.
मृत्यूचा दारात जाऊन परत आला…
ही घटना २०२३ मध्ये युकेच्या एका ३० वर्षाच्या हेल्दी व्यक्ती संदर्भात घडली. ही व्यक्ती कार चालवत होती. तेव्हा अलर्जीमुळे त्याला शिंक येऊ लागली. त्याने छींक टाळण्यासाठी नाकपुड्या चिमटीत पकडल्या आणि तोंड बंद केले. त्याची शिंक तर थांबली, परंतू लागलीच गळातून तीव्र वेदना सुरु झाल्या. त्याला असे वाटले की आता काही फाटले आहे. त्याला श्वास घेता येईना. मानेला सुज आली. हॉस्पिटलात गेल्यानंतर सीटी स्कॅन केले तर कळले की त्याची श्वास नलिकेला 2×2 मिलीमीटरचे छीद्र पडले होते. हवा छाती आणि फुप्फुसाच्या दरम्यान भरली गेली (प्न्यूमोमीडियास्टाइनम), ज्यामुळे त्याच्या प्राणावर बेतले गेले असते.
येथे पाहा व्हिडीओ –
View this post on Instagram
अशा प्रकारची पहिलीच घटना –
ही घटना आश्चर्यकारक आहे. आम्ही याच्या आधी कधीच अशी केस पाहीली नव्हती असे डॉ. रासाद्स मिसिरोव्स यांनी सांगितले. डॉक्टरांनी सांगितले की छींक रोखल्याने वरच्या श्वसननलिकेमध्ये प्रेशर सामान्याहून ५ ते २४ टक्के वाढले जाते. BMJ रिपोर्टनुसार हे प्रेशर इतके जास्त आहे की त्याने ट्रेकिया फाटू शकते. या केसमध्ये प्रेशर २० टक्क्याहून जास्त झाले होते. ज्यामुळे श्वासनलिकेला छीद्र पडले. जर हे छीद्र मोठे असते तर इन्फेक्शन, ब्लीडींग वा श्वास रोखल्याने या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकला असता. या रुग्णाला पेन किलर देण्यात आले. ४८ तास निरीक्षणाखाली ठेवले. नशिबाने पाच आठवड्यात हे छीद्र स्वत:हून भरले. मात्र, डॉक्टरांनी इशारा दिला आहे की शिंक आली असता नाक-तोंड कधी दाबू नका,हे ट्रेकियल पर्फोरेशनचे कारण बनू शकते.
