VIDEO: भंगाराचा व्यवसाय करणाऱ्या मुस्लीम व्यक्तीला टोळक्याची मारहाण, ‘जय श्रीराम’ बोलायची सक्ती

| Updated on: Aug 29, 2021 | 2:38 PM

Muslim man beaten | स्थानिक तरुणांच्या टोळक्याने या मुस्लीम व्यक्तीकडील भंगारातील वस्तुंची फेकाफेक केली. तसेच त्याला पुन्हा गावात प्रवेश करु नको, असे बजावले. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधितांचा शोध सुरु केला आहे.

VIDEO: भंगाराचा व्यवसाय करणाऱ्या मुस्लीम व्यक्तीला टोळक्याची मारहाण, जय श्रीराम बोलायची सक्ती
Follow us on

भोपाळ: मध्य प्रदेशातील उज्जैन येथे एका मुस्लीम व्यक्तीवर स्थानिक तरुणांच्या टोळक्याने दादागिरी केल्याचा व्हीडिओ समोर आला आहे. या टोळक्याने या मुस्लीम व्यक्तीला मारहाणही केली. तसेच जबरदस्तीने जय श्रीराम’ बोलायला लावले. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्जैन येथील सेकली या गावात ही घटना घडली. याठिकाणी एक मुस्लीम व्यक्ती भंगारचा व्यवसाय करतो. भंगाराच्या शोधात हा व्यक्ती गावात फिरत होता. त्यावेळी स्थानिक तरुणांच्या टोळक्याने या मुस्लीम व्यक्तीकडील भंगारातील वस्तुंची फेकाफेक केली. तसेच त्याला पुन्हा गावात प्रवेश करु नको, असे बजावले. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधितांचा शोध सुरु केला आहे.

दिग्विजय सिंहांकडून पोलिसांवर टीका

या घटनेनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. ही घटना अपराध ठरत नाही का? पोलीस आरोपींवर कारवाई कधी करणार, असा सवाल दिग्विजय सिंह यांनी विचारला. काही दिवसांपूर्वी इंदौर येथेही एका बांगडी विक्रेत्याला अशाप्रकारे मारहाण करण्यात आली होती. या बांगडी विक्रेत्याने अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचे कारण पुढे करत जमावाने त्याला बेदम मारेल होते. हा व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून लहान मुलीसमोरच वडिलांना मारहाण

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्येही असाच प्रकार घडला होता. त्यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका मुस्लीम व्यक्तीला बेदम मारहाण केली होती. मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव अहमद असे होते. अहमद यांना त्यांच्या लहान मुलीसमोर टोळक्याने मारहाण केली. टोळक्याने त्यांना बळजबरीने ‘जय श्रीराम’च्या घोषणाही द्यायला लावल्या होत्या.

हा सर्व प्रकार सुरु असताना अहमद यांची लहान मुलगीही त्यांच्यासोबतच होती. आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी तिने बरीच गयावया केली. मात्र, वडिलांना बिलगून रडणाऱ्या या चिमुरडीची कोणालाही दया आली नाही. टोळक्याने मारहाण करुन झाल्यानंतर अहमद यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस आल्यानंतर अहमद यांना मारहाण सुरुच होती. या घटनेवरुन उत्तर प्रदेश पोलिसांवर अनेकांनी टीका केली होती.

इतर बातम्या:

 

Breaking : राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड, दिल्ली बलात्कार पीडित प्रकरणात फोटो पोस्ट केल्याबाबत कारवाई