Video : जनावरांच्या गोठ्यात जाळं आणि धुर संगट, शेतकऱ्याचा गावठी जुगाड व्हायरल

| Updated on: Sep 04, 2022 | 8:05 PM

ज्यावेळी जनावरांच्या अंगावरती गोचिड होतात. त्यावेळी शेतकरी गावाकडं झाडपाल्याचं औषध किंवा एखाद्या मेडिकल मधील औषधाचा वापर करतात.

Video : जनावरांच्या गोठ्यात जाळं आणि धुर संगट, शेतकऱ्याचा गावठी जुगाड व्हायरल
जनावरांच्या गोठ्यात जाळं आणि धुर संगट, शेतकऱ्याचा गावठी जुगाड व्हायरल
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : मागच्या दोन दिवसांपासून एका शेतकऱ्याचा (Farmer) गावठी जुगाड केलेला व्हिडीओ (Viral Video) चांगलाचं व्हायरल झाला आहे. जनावरांच्या गोठ्यात शेतकऱ्याने लिंबाच्या फाद्यांची धुरांडी केली आहे. ती धुरांडी सगळ्या गोठ्यात पसरण्यासाठी पंख्याचा जुगाड केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाचं व्हायरल झाला आहे. तसेच ज्या शेतकऱ्याने हा जुगाड केला आहे, त्यांचं कौतुक देखील सोशल मी़डियावर (Social Media) पाहायला मिळत आहे. मुळात ग्रामीण भागात आत्तापर्यंत असे अनेक जुगाड केले जातात. त्यापैकी हा एक जुगाड आहे. सध्याचा व्हिडीओ कोणत्या भागातला आहे याची अद्याप माहिती मिळालेली नाही.

नेमकं काय आहे व्हिडीओत

सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ फक्त तीस सेकंदाचा आहे. त्यामध्ये लिंबाच्या फांद्याची जनावराच्या गोठ्यात धुरांडी केली आहे. ही धुरांडी गोठ्यात सगळीकडे पसरावी यासाठी शेतकऱ्याने धुरांडी शेजारी एक टेबल पंखा ठेवला आहे. तो पंखा ती धुरांडी सगळ्या गोठ्यात पसरवत आहे. हा महाराष्ट्रातील असावा अशा अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

लिंबाचा धूर गोचिड पिसवा मारतो

ज्यावेळी जनावरांच्या अंगावरती गोचिड होतात. त्यावेळी शेतकरी गावाकडं झाडपाल्याचं औषध किंवा एखाद्या मेडिकल मधील औषधाचा वापर करतात. विशेष म्हणजे पाळीव जनावरांच्या अंगावरती पिसवा अधिक होतात. त्या झाल्यानंतर काही शेतकरी जनावर उन्हात बांधतात. तर काही शेतकरी लिंबाच्या पानाची धुरांडी करुन त्यांना पळवण्याचा प्रयत्न करतात.