बापरे! या काकांनी चहासोबत बघा काय केलं…

ते चहाचा कप अशा प्रकारे सेट करतात की चहा थोडाही पडत नाही. ते स्कूटी घेऊन काही अंतरावर जातात आणि

बापरे! या काकांनी चहासोबत बघा काय केलं...
tea
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 27, 2022 | 10:51 AM

चहा जर आपल्याला कुठे पार्सल न्यायचा असेल तर प्रश्न पडतो की न्यायचा कसा. बरं तो समजा आणलाच पार्सल तर मग तो पुन्हा कपात ओता मग तो प्या. ही सगळी फारच कंटाळवाणी प्रोसेस आहे. नाही का? पण काही लोक फार टॅलेंटेड असतात. त्यांच्याकडे सगळ्या गोष्टींचा उपाय असतो. एक काका चहा चक्क स्कुटीच्या डिक्कीत घेऊन जातात. ते असे चहाचे ग्लास उचलतात, चहाने पूर्ण भरलेला कप ते डिक्कीत ठेवतात.

खरं तर या व्हिडीओमध्ये एक काका स्कुटीच्या सीटखाली चहाने भरलेला कप ठेवून आरामात गाडी चालवतात आणि विशेष म्हणजे चहा अजिबात सांडत नाही.

तुमच्याकडेइतकं टॅलेंट आहे का? व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की काका स्कुटीची सीट वर उचलून त्याच्या आतमध्ये दोन कप चहा ठेवतात, जे चहाने भरलेले असतात.

ते चहाचा कप अशा प्रकारे सेट करतात की चहा थोडाही पडत नाही. ते स्कूटी घेऊन काही अंतरावर जातात आणि एका दुकानासमोर थांबतात. मग ते हळूच स्कुटीवरून खाली उतरतात आणि सीटच्या आतून दोन्ही कप चहा बाहेर काढतात, मग एक कप आपल्या मित्राला देतात आणि दुस-या कपमधून स्वतः चहा पितात.

हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Gulzar_sahab नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘वॉव अमेझिंग टॅलेंट’.

अवघ्या 38 सेकंदाच्या या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत, तर शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईक करून विविध कमेंट्स केल्या आहेत.