रांगेत उभा राहून तरुण कमवतो दिवसाला 16 हजार रुपये

| Updated on: Jan 18, 2022 | 4:08 PM

गर्दीतील रांगेत थांबून ब्रिटनमधील एकजण दिवसाला हजारो रुपये कमवतो असे कुणी तुम्हाला सांगितले असेल तर ते नक्कीच धक्कादायक असेल. मात्र हे शंभर टक्के खरे आहे. लंडनमध्ये राहणारा फ्रेडी बेकिट हा ते काम करत आहे.

रांगेत उभा राहून तरुण कमवतो दिवसाला 16 हजार रुपये
Follow us on

लंडनः कधी तुम्ही काही मिनिटांसाठी प्रचंड गर्दीत तुम्ही तुमच्यासाठी रांगेत थांबला असाल तर ते नक्कीच तुम्हाला कंटाळवाणं वाटले असेल. पण अशाच गर्दीतील रांगेत थांबून ब्रिटनमधील एकजण दिवसाला हजारो रुपये कमवतो असे कुणी तुम्हाला सांगितले असेल तर ते नक्कीच धक्कादायक असेल. मात्र हे शंभर टक्के खरे आहे. लंडनमध्ये राहणारा फ्रेडी बेकिट  (Freddie Beckitt) हा तेथील श्रीमंत लोकांसाठी लांबच लांब लागलेल्या रांगेत थांबून तो दिवसाला तो किती कमवतो याचा अंदाज लावणे खरच कठीण आहे. नोकरदार माणसांची जेवढी वर्षाची कमाई होते तेवढी रक्कम तो फ्रेडिक महिनाभरात कमवतो.

पैसा कमवणे ही एक कला आहे आणि त्यामध्ये फ्रेडी हा माहिर आहे. 31 वर्षाचा असणारा फ्रेडी बेकिट हा लंडनमधील फुलहम येथे राहणारा आहे. त्याने पैसे कमवण्यासाठी एक भन्नट कल्पाना शोधून काढली आहे. त्या कल्पनेने अनेक जणांना सुखद धक्का बसतो. फ्रेडीची कमाईची माहिती काढल्यानंतर समजते की, या कामासाठी त्याला एवढी रक्कम मिळू शकते. फ्रेडी हा प्रोफेशनल क्यूरर आहे. कितेयेक वेळा तो खराब आणि त्रासदायक वातावरणातही लांबच लांब असणाऱ्या रांगेत थांबून होता.

फुलहममध्ये राहणारा फ्रेडी बेकिट हा गेल्या तीन वर्षापासून दुसऱ्यांसाठी लांबच लांब असणाऱ्या रांगेत उभा राहून खूप सारा पैसा कमवला आहे. यामुळे त्याने आता पूर्णवेळ व्यवसाय सुरू केला आहे. त्याची कमाई ऐकून अनेक जणांना धक्का बसतो कारण तो दिवसाला १६ हजारपेक्षा जास्त रक्कम कमवतो आहे. त्याच्या या हिशोबानुसार तो महिन्याला किमान 5 लाख रुपये कमवत आहे. त्याच्या या व्यवसायाची कमाई ऐकून अनेक जणांच्या भुवया उंचवल्या जातात.

फ्रेडीच्या या व्यवसायामध्ये असे ग्राहक आहेत ज्यांना रांगेत उभा राहणे आवडत नाही. असे लोक रांगेत उभा राहण्यासाठी फ्रेडीकला बोलवून घेतात, आणि त्यासाठी मोठी रक्कमही त्याला देतात. एखादी म्युझिक कॉन्सर्ट असेल तर त्याच्या तिकिटासाठी लोक फ्रेडीकला रांगेत उभा राहण्यासाठी पैसे देतात. फ्रेडीक हा रांगेत एक तास उभा राहण्यासाठी दोन हजार रुपये घेतो. त्यानुसार दिवसाला तो 15 ते 16 हजार रुपये कमवत आहे.

संबंधित बातम्या

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची उपसेनाध्यक्ष पदावर निवड

Punjab Assembly Election 2022: ‘आप’कडून भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार, पब्लिक व्होटिंगनंतर केजरीवाल यांचा निर्णय

Corona Cases India : देशात 2 लाख 38 हजार नवे रुग्ण, ओमिक्रॉनबाधितांची संख्या 9 हजारांच्या उंबरठ्यावर