लग्नात वडील आधी मुलीच्या अंगावर थुंकतात, नंतर निरोप देतात; लग्नाशी निगडित विचित्र परंपरा

लग्न हे सहसा प्रत्येक समाजात पाहायला मिळतं पण लग्नासाठी सगळीकडे वेगवेगळ्या प्रथा अवलंबल्या जातात, त्यातील काही इतक्या विचित्र असतात की त्यांच्याबद्दल ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.

लग्नात वडील आधी मुलीच्या अंगावर थुंकतात, नंतर निरोप देतात; लग्नाशी निगडित विचित्र परंपरा
Marriage bride
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 03, 2023 | 5:42 PM

माणूस हा सामाजिक प्राणी असून त्याला समाजातील लोकांमध्ये राहायला आवडते, असे म्हटले जाते. प्रत्येक समाजाची स्वतःची संस्कृती असते, स्वतःची परंपरा असते आणि काही श्रद्धा असतात, ज्या त्या समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पाळायला हव्यात. लग्न हे सहसा प्रत्येक समाजात पाहायला मिळतं पण लग्नासाठी सगळीकडे वेगवेगळ्या प्रथा अवलंबल्या जातात, त्यातील काही इतक्या विचित्र असतात की त्यांच्याबद्दल ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. अशाच एका विचित्र परंपरेबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

केनिया आणि टांझानियाच्या काही भागात मसाई ट्रायब नावाची एक विशेष आदिवासी जमात राहते. येथे लग्नादरम्यान वधूचे वडील मुलीच्या स्तनांवर आणि डोक्यावर थुंकून आशीर्वाद देतात आणि तिला पाठवतात.

मुलगीही वडिलांच्या या थुंकीला आपला आशीर्वाद मानते. असे केल्याने येणाऱ्या आयुष्यात सुख राहते आणि मुलीच्या कुटुंबात शांती आणि आनंद राहतो, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे.

केनियाच्या जमाती थुंकणे अत्यंत शुभ मानतात. हा त्यांच्या संस्कृतीचा आणि समाजाचा भाग आहे. याशिवाय टांझानियातील जमातींमध्ये थुंकण्याची परंपरा पाहायला मिळते. इथं लोक याकडे सन्मान म्हणून पाहतात.

मसाई आदिवासी जमातीत थुंकीचा वापर इतर प्रकारेही केला जातो, जसे की एखाद्याचे स्वागत करताना हात हलवताना प्रथम तळहातावर थुंकणे. लग्नाच्या वेळी जेव्हा कुटुंबीय मुलीला निरोप देतात, तेव्हा मुलीला हा आदेश दिला जातो, तिने मागे वळून पाहू नये. याशिवाय मसाई आदिवासी जमात त्यांच्या वेशभूषेसाठी देखील खूप प्रसिद्ध आहे.