Trending : लव्ह स्टोरी की पैशांचा सापळा? 8 प्रियकर, 10 कोटी आणि तुरुंगवास, प्रकरण वाचताच पायाखालची जमीन सरकणार

Trending Love Story : तर या तरुणीने प्रेमाचे असे काही जाळे विणले की म्हणता म्हणता 8 जणांना मोठे चंदन बसले. आपल्या कातील सौंदर्याने तिने 9 वा तरूण शिकारीसाठी हेरला. तिने जाळे टाकले. पण...

Trending : लव्ह स्टोरी की पैशांचा सापळा? 8 प्रियकर, 10 कोटी आणि तुरुंगवास, प्रकरण वाचताच पायाखालची जमीन सरकणार
रूप की राणी, केले काय?
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 20, 2025 | 4:44 PM

प्रत्येकाला वाटते की त्याने, तिने कोट्याधीश व्हावे. त्यासाठी प्रत्येक जण काही ना काही खटाटोप करत असते. कोणी बचत करतं. कोणी नोकरी बदलते. कोणी व्यवसाय करते. गुंतवणूक करून पैसा वाढवण्याचा प्रयत्न सुरूच असतो. पण या तरुणीला मोठी घाई होती. तिला अवघ्या पाच वर्षातच कोट्याधीश व्हायचे होते. मग तिने तिच्या सौंदर्याचा यासाठी वापर करण्याचा खतरनाक खेळ खेळला. तिच्या या खेळात 8 जण कंगाल झाले. पण पुढे असे झाले की…

या तरुणीने तिच्या सौंदर्याचा फायदा घेण्याचे ठरवले. तिने आपल्या मादक अदांनी आठ जणांना लुटले. चीनमधील हे प्रकरण सध्या जगभर व्हायरल होत आहे. 24 वर्षांच्या यिन शुए हिला संपत्तीची नशा होती. तिला अवघ्या पाच वर्षांत काहीही करून धनकुबेर व्हायचे होते. त्यासाठी अर्थातच तिला शॉर्टकट हवा होता. त्यासाठी तिने 8 प्रियकर बनवले. यिन शूए हिचे कुटुंब गरीब होते. तिला पाच वर्षांत 10 कोटी रुपये कमवायचे होते.

तिने मग आकर्षक, कमनीय बांधा आणि सुंदर चेहरा, सुडौल बांध्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली. नोकरी सोडली. त्यातील पैसे सौंदर्यासाठी खर्च केले. यिन फिटनेस रुटीन, आकर्षक ड्रेस घालून इंटरनेटवर श्रीमंतांना गळ लावू लागली. तिने सुरुवातीला दोन-तीन प्रियकर गळाला लावले. त्यांच्या घरी जाऊन ती मुक्काम ठोकायची. तिथल्या महागड्या वस्तू चोरायची. हे चोरीचे सामान ती ऑनलाईन सेंकड हँड प्लॅटफॉर्म्सवर विक्री करायची. हातचालाखी यशस्वी होताच ती मोठंमोठे हात मारायला लागली. तिने 8 श्रीमंत प्रियकरांकडून जवळपास 22 लाख रुपयांची कमाई केली.

अशी पकडल्या गेली यीन

तिने 9 वा प्रियकर हेरला. त्याच्याकडे खूप संपत्ती असल्याचे तिने अगोदरच माहिती काढली होती. त्याला चांगलाच गंडा घालण्याचा तिचा विचार होता. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तिने त्याला चोरलेली महागडी वस्तू गिफ्ट दिली. त्याच्या घरी मुक्काम केला. तिथे तिने हात साफ केला. पण एका ठिकाणच्या सीसीटीव्हीत ती चोरी करताना कैद झाली. प्रियकराला तर धक्काच बसला. त्याने तातडीने पोलिसांना बोलावले. यिनला पकडल्यावर तिचे कारनामे ऐकून पोलिसही चक्रावले.