
Viral Video: सोशल मीडियावर कायम चांगले वाईट व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता देखील सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. रेल्वे स्थानकावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर रेल्वे स्थानकावरील पाणी आणि चहा पित असाल, तर व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचे विचार बदलू शकतील. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ रेल्वे स्थानकाच्या छतावरून रेकॉर्ड करण्यात आला आहे. व्हिडीओ मोठ्या पाण्याच्या टाक्या ठेवण्यात दिसत आहेत. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे अनेक माकडे त्या टाक्यांमध्ये आनंदाने आंघोळ करत आहेत.
व्हिडीओमध्ये काही माकड एकमेकांवर पाणी शिंपडताना दिसत आहेत, मजा करत आहेत आणि आंघोळीचा आनंद घेत आहेत. जर तुम्ही लक्ष दिलं तर हे तेच पाणी आहे, जे प्रवासी पिण्यासाठी किंवा स्टेशनवर विक्रेते चहा बनवण्यासाठी वापरतात. हे दृश्य भयानक आणि घृणास्पद आहे. व्हिडिओ समोर येताच लोक राग आणि आश्चर्य व्यक्त करू लागले. अनेक लोक या टाक्यांची स्वच्छता आणि सुरक्षितता करण्याची जबाबदारी घेणाऱ्या यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केला आहे.
व्हिडिओमध्ये तुम्हाला रेल्वे स्टेशनच्या छतावर ठेवलेल्या टाकीत काही माकडे आनंदाने आंघोळ करताना दिसतील. हे संपूर्ण दृश्य जवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्याच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले आहे, जे आता सोशल मीडियावर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ही घटना कुठे घडली याची माहिती आपल्याकडे नसली तरी, हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचताच व्हायरल झाला. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या सर्वत्र व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
हा व्हिडिओ आयुर्योगसंगम नावाच्या अकाउंटने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘मला आता कळलं की रेल्वेस्टेशनवरील चहा असा का लागतो…’, सध्या सर्वत्र व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.