
चित्रपटांमध्ये चोरी करण्याचे अनेक प्रकार दाखवले जातात. थरारक असणारे ते चित्रपटातील सीन प्रत्यक्षात साकारणे अवघड असते. काही वर्षांपूर्वी आलेल्या धूम चित्रपटात धाडसी चोरी करणारे कलाकार चोरी करुन बाईकवरुन फरार होत असल्याचे दाखवले होते. त्याच पद्धतीच्या धाडसी चोरीचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जीवावर उदार होऊन चोरी करण्याचा हा प्रकार आहे. मुंबई- दिल्ली महामार्गावर हा प्रकार घडला आहे.
दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर माल भरलेला ट्रक जात आहे. बाईकवर तिघे जण त्या ट्रकच्या मागे जात आहे. त्यातील दोघे जण ट्रकवर चढतात. ट्रकवरील सामान रस्त्यावर फेकतात. त्याचवेळी बाईक चालवणारा व्यक्ती ट्रकजवळ पोहचतो. अगदी सहजपणे ते दोघे व्यक्ती ट्रॅकमधून बाईकवर उतरतात. ट्रकमधून उतरत पहिला जण बाईकवर बसल्यानंतर दुसरा जण पुन्हा उतरुन बाईकवर बसतो. त्यानंतर ती बाईक ट्रकचा मागे जाण्याऐवजी रस्त्यावरील माल उचलण्यासाठी वेगळ्या मार्गाला लागते. हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
ट्रकच्या मागे जाणाऱ्या काही लोकांनी चोरीचा हा व्हिडिओ बनवला आहे. त्यानंतर तो सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हजारो जणांनी या धाडसी चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिला आहे. त्यावर अनेकांनी कॉमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील महामार्गावरील असल्याचा दावा केला जात आहे.
दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवर धावत्या ट्रकमधून सामानाची चोरी pic.twitter.com/Jk04UBiDlk
— jitendra (@jitendrazavar) May 26, 2024
दरम्यान, ट्रकवर चोरी होत असल्याची माहिती ट्रकचालकला मिळते. ट्रक चालक लागलीच आपली गाडी थांबतो. त्यामुळे चोरी करणारे फरार होतात. त्यानंतर ट्रकचालकांनी आंदोलन केले. लालघाटी पोलीस ठाण्याचे कर्मचारी आल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. लालघाटी पोलीस ठाण्याचे प्रभारी भीम सिंह पटेल यांनी या भागात चोरीच्या घटना वाढल्या असल्याचे सांगितले. देवास आणि तराना दरम्यान धावत्या गाड्यांमधून चोरी होत असल्याच्या तक्रारी येत असल्याचे त्यांनी सांगितले.