मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुंबईत बसलेल्या एका व्यक्तीने दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलकांसाठी जेवण पाठवले होते. डिलिव्हरी बॉय भर पावसात जेवणाचे पॅकेट वाटताना दिसत आहे.

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक
Delivery Boy
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 22, 2026 | 4:15 PM

दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर येताच संपूर्ण देशाचे मन जिंकले आहे. धैर्य आणि मानवता जेव्हा एकत्र येते, तेव्हा शेकडो किलोमीटरचे अंतरही अर्थहीन होते. मुंबईत बसलेल्या एका व्यक्तीने दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या लोकांसाठी ऑनलाइन जेवण ऑर्डर केले. जोरदार पावसात Zomato चा डिलिव्हरी बॉय मोठी पाकिट घेऊन जंतर-मंतर येथे पोहोचला. तेथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. या भावनिक आणि निस्वार्थ कृतीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

मदत करणारी ती व्यक्ती कोण?

आंदोलकांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था करणारा हा व्यक्ती म्हणजे मुंबईतील अनुज रावत. Zomato डिलिव्हरी बॉयने सांगितले की, अनुज रावत यांनी ऑनलाइन ऑर्डर केली होती आणि स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, हे जेवण जंतर-मंतर येथील भूक लागलेल्या आंदोलकांना द्यावे. पूर्ण पैसे अनुज यांनी आधीच ऑनलाइन दिलेले होते. व्हिडीओमध्ये भर पावसात डिलिव्हरी बॉय जेवणाची मोठी पाकिटे घेऊन उभा असल्याचे दिसत आहे.

‘हाच खरा भारत आहे’

या व्हिडिओसोबत एक सुंदर संदेशही व्हायरल होत आहे. “हा तो भारत आहे ज्याला आम्ही हरवू द्यायला तयार नाही. शेकडो मैल दूर बसून लोक Zomato आणि Swiggy वरून जेवण ऑर्डर करत आहेत आणि डिलिव्हरी पार्टनर्सना सांगत आहेत की, जंतर-मंतरवर उपाशी आंदोलकांना जेवण द्यायला. हेच खरे भारताचे मन आहे” असा संदेश व्हिडीओसोबत लिहिला आहे. मुंबई ते दिल्लीपर्यंतचा हा प्रवास आणि पावसातही आपली ड्यूटी बजावत मदत करणारा डिलिव्हरी बॉय, प्रत्येकाला भावूक करत आहे.

सोशल मीडियावर भरभरून प्रशंसा

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनुज रावत आणि Zomato डिलिव्हरी बॉय यांची सोशल मीडियावर जोरदार प्रशंसा होत आहे. एका युजरने लिहिले, “लोक म्हणतात आंदोलनामागे फंडिंग असते, पण पाहा, सामान्य भारतीय आपल्या खिशातून पैसे काढून मदत करत आहेत. या भावाला सलाम!” दुसऱ्या एका युजरने Zomato आणि Swiggy ला टॅग करत म्हटले, “अशा ठिकाणांसाठी काही विशेष डिस्काउंट किंवा वेगळा पर्याय सुरू करायला हरकत नाही का?”

Follow Us