Mumbai Rain: मरीन ड्राईव्ह, दर्गाह, प्रेम, एकटेपणा! कशीही असो, पावसात मुंबई छानच दिसते…एकसे बढकर एक फोटो

Mumbai Rain: आपल्या आजूबाजूला काय चालू आहे हे सोशल मीडियावरून जितकं आपल्याला कळू शकतं ते दुसरं कुठूनच नाही. चला मग बघुयात मुंबईच्या पावसाचे व्हायरल फोटोज!

Mumbai Rain: मरीन ड्राईव्ह, दर्गाह, प्रेम, एकटेपणा! कशीही असो, पावसात मुंबई छानच दिसते...एकसे बढकर एक फोटो
Mumbai Photographs In Rainy Season
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 08, 2022 | 3:29 PM

मुंबईः मुंबईचा पाऊस म्हणजे कहर! मुंबईत पाऊस (Mumbai Rains) सुरु झाला की इथे आपोआप दोन गट पडतात. एक जो पावसाच्या प्रेमात पडून कविता लिहीतो आणि दुसरा ज्या गटाला पाऊस अजिबात आवडत नाही. पाऊस आपल्याला किती गरजेचा आहे हे काय सांगणं म्हणजे मूर्खपणा ठरेल. पण तरीही एका पॉईंटला आलं की हा पाऊस नको नकोसा होतो. जेव्हापासून पाऊस सुरु झालाय लोकं सुद्धा जाम सक्रीय झालेत सोशल मीडियावर. कुणी मिम्स शेअर (Memes On Mumbai Rains) करून मुंबईतल्या पावसाचं मजेशीर वर्णन करतंय तर कुणी फोटोज पोस्ट (Mumbai Rain Photographs) करून सत्य समोर ठेवतंय. आपल्या आजूबाजूला काय चालू आहे हे सोशल मीडियावरून जितकं आपल्याला कळू शकतं ते दुसरं कुठूनच नाही. चला मग बघुयात मुंबईच्या पावसाचे व्हायरल फोटोज!

1)  मुंबई आणि मरीन ड्राईव्ह, तेपण पावसाळ्यात!!

– इंस्टाग्राम हँडल @mymumbai व्हिडीओग्राफर @deomanish

2) पावसात एकटाच छत्री घेऊन चालणार माणूस! मुंबईच अजून कुठे?

हा फोटो एका मोठ्या अमेरिकन फोटोग्राफरने स्टीव्ह मॅककरी यांनी काढलाय. रेट्रो टाईपमधला हा फोटो लोकांना खूप आवडतो.

– इंस्टाग्राम हँडल @mymumbai फोटोग्राफर @stevemccurryofficial

3) प्रेम आणि पाऊस!

– इंस्टाग्राम हँडल @mymumbai फोटोग्राफर @yashsheth3

4) जिंदगी में ये नहीं किया तो क्या किया!

– इंस्टाग्राम हँडल @mymumbai फोटोग्राफर @starryeyes2054

5) ओहोटीच्या वेळी दर्गाहला जाताना काढलेला फोटो!

हा फोटो माहीममध्ये काढलेला आहे. जेव्हा भर पावसाळ्यात संपूर्ण कुटूंब दर्गाह ला जात असतं, तेव्हा काढलेला हा फोटो.

– इंस्टाग्राम हँडल @mymumbai फोटोग्राफर @sl_shanth_kumar

(ही बातमी केवळ मनोरंजनासाठी आहे. कुणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाही.)