मुंबईतील 37 वर्षीय सुंदरीला हवा जीवनसाथी, तिच्या अपेक्षा तर वाचा…

marriage viral post: महिलने खूप कर्ज घेतले दिसते. ते कर्ज फेडण्यासाठी तिला बकरा हवा आहे. महिलेने इटलीमधील नवरा चालणार असल्याचे म्हटले आहे. त्यावर एक जण म्हणतो, तिला कधीकाळी इटालियन व्यक्तीशी प्रेम झाले असणार...अशा अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

मुंबईतील 37 वर्षीय सुंदरीला हवा जीवनसाथी, तिच्या अपेक्षा तर वाचा...
marriage
| Updated on: Apr 03, 2024 | 1:59 PM

लग्न दोन जीवांचे मिलन असते. जुन्या काळात नातेवाईकांनी सुचवलेले स्थळ निश्चित होत होते. परंतु सोशल मीडियाच्या काळात त्यात बदल झाले आहे. आता वर कसा हवा आणि वधू कशी हवी? याच्या जाहिराती दिल्या जातात. सोशल मीडियावर अपेक्षा व्यक्त केल्या जातात. मुंबईतील एका 37 वर्षीय युवतीला (महिलेला) जीवनसाथी हवा आहे. तिच्या पतीसंदर्भातील अपेक्षा खूपच वेगळ्या आहेत. तिच्या अपेक्षासंदर्भातील यादीचा एक स्नॅपशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला अनेकांनी लाईक केले आहे. त्या मुलीचा वार्षिक पगार चार लाख आहे. परंतु तिला एक कोटी कमवणारा पती हवा आहे.

कसा हवा पती

एक्स युजर्स अंबरने महिलेच्या अपेक्षा सांगणारा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. ती महिला स्वत: मुंबईत राहणारी आहे. तिचा वार्षिक मिळकत चार लाख आहे. घरात लहाण बहीण आणि लहान भाऊ आहे. परंतु त्या महिलेचा पतीसंदर्भात खूपच अपेक्षा आहे. मुंबईत घर, नोकरी किंवा व्यवसाय असणारा पती तिला हवा आहे. त्याचे वर्षाचे उत्पन्न 1 कोटी हवे आहे. मुलगा MBBS किंवा CA हवा. नोकरीत मोठा पदावर असणारा उच्च शिक्षित व्यक्ती चालणार आहे. मुंबईत त्याचे स्वत:चे घर हवे. त्याच्याकडे इतर संपती हवी आहे. परदेशात राहत असल्यास युरोपला प्राधान्य आहे. इटलीमधील व्यक्ती चालणार आहे.

पोस्ट व्हायरल

2 एप्रिल रोजी शेअर केलेल्या या पोस्टला एकाच दिवसात हजारो व्हिव्यू मिळाल्या आहेत. अनेकांनी लाईक आणि शेअर केली आहे. त्या पोस्टवर अनेक मजेशीर कॉमेंट येत आहेत. एक युजर म्हणतो, भारतात फक्त 1.7 लाख लोकांचे उत्पन्न एक कोटी आहे. यामुळे त्या महिलेस हवा तसा नवरा मिळण्याची संधी केवळ 0.01% आहे.

एकाने चिमटे घेते म्हटले आहे की, त्या महिलने खूप कर्ज घेतले दिसते. ते कर्ज फेडण्यासाठी तिला बकरा हवा आहे. महिलेने इटलीमधील नवरा चालणार असल्याचे म्हटले आहे. त्यावर एक जण म्हणतो, तिला कधीकाळी इटालियन व्यक्तीशी प्रेम झाले असणार.