फजिती तर बघा, लॉटरीवर दोघांची नावं आली! पुढे काय झालं वाचा…

अनेक वेळा काही जण यासाठी अनेक वर्षे नशीब अजमावतात, मग त्यांना जॅकपॉट लागतो.

फजिती तर बघा, लॉटरीवर दोघांची नावं आली! पुढे काय झालं वाचा...
Lottery ticket
Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 28, 2022 | 4:56 PM

लॉटरीचा खेळ खूप खतरनाक असतो. जॅकपॉट मिळताच लोक एका झटक्यात करोडपती बनतात. अनेक वेळा काही जण यासाठी अनेक वर्षे नशीब अजमावतात, मग त्यांना जॅकपॉट लागतो. पण केरळमधून लॉटरीची एक अतिशय रंजक गोष्ट समोर आली आहे, जिथे दहा हजार कोटी रुपयांच्या लॉटरीवर दोन जणांची नावं समोर आली.

खरं तर ही घटना अमेरिकेतील एका शहरातील आहे. अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘इलिनॉय लॉटरी’ अंतर्गत लॉटरी खूप महागडी ठरल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यावेळी नाव देण्यात आलंनव्हतं. केवळ लॉटरीचा क्रमांक सांगून त्याची रक्कम जाहीर करण्यात आली. गमतीची गोष्ट अशी की, बराच वेळ कुणीही ते घ्यायला गेलं नाही.

काही वेळाने दोन जणांनी त्यावर दावा केला. दोघांनीही जाऊन आम्हाला लॉटरीचे पैसे मिळाले पाहिजेत, असा दावा केला. लॉटरीच्या अधिकाऱ्यांनी दोघांचीही संख्या तपासली, तेव्हा दोघांची संख्या प्रत्यक्षात सारखीच होती. दोघांचेही नाव लॉटरीत समाविष्ट होते. यानंतर या दोघांना मिळून दहा हजार कोटी रुपये देण्यात येतील, असं ठरलं.

विजेत्यांना यापेक्षा जास्त पैसे दिले जाणार नाहीत, अशी अट त्यात असल्याने तसा निर्णयही घेण्यात आला. या घोषणेनंतर दोन्ही विजेत्यांनी पैशांची समान विभागणी करण्याचा निर्णय घेतला. सध्या लॉटरी विजेत्यांनीही आपली ओळख लपवून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इलिनॉय लॉटरीचे संचालक म्हणाले की, दोन्ही विजेते आता त्यांना मिळणाऱ्या पैशाचे काय करायचे हे ठरवू शकतात.