मेट्रोमध्ये अचानक माहोल बनला! नेहा कक्करनेही केलं कौतुक,व्हिडीओ व्हायरल

असाच काहीसा प्रकार हा व्हिडिओ पाहून तुमच्यासोबत होऊ शकतो. या व्हिडीओमध्ये एका मुलाने मेट्रोमध्ये असं काही केलं, ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती.

मेट्रोमध्ये अचानक माहोल बनला! नेहा कक्करनेही केलं कौतुक,व्हिडीओ व्हायरल
Singing Video
Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 11, 2022 | 5:27 PM

सोशल मीडियावर (Social Media) एकापेक्षा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ लोकांच्या खूप काळ लक्षात राहतात. असाच काहीसा प्रकार हा व्हिडिओ पाहून तुमच्यासोबत होऊ शकतो. या व्हिडीओमध्ये एका मुलाने मेट्रो (Metro) मध्ये असं काही केलं, ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. या व्हिडीओमध्ये मेट्रोमध्ये अनेक प्रवासी दिसत आहेत. सगळ्या सीट्स भरलेल्या असतात त्यामुळे हा मुलगा उभा असतो आणि मग त्याची नजर इंडियन आयडॉलच्या (Indion Idol) जाहिरातीकडे जाते.

हा व्हिडिओ बॉलिवूड गायिका नेहा कक्करने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहा…

या मुलाकडे एक गिटारसुद्धा आहे. मेट्रोतच अरिजित सिंगचं ‘केसरीया’ गाणं गायलं आणि मेट्रोचा मूडच बदलला. हळू हळू सर्व प्रवासी आपला थकवा विसरतात आणि गायला लागतात. गाण्यावर थिरकू लागतात.

हा व्हिडिओ पाहून अनेक लोक प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. बरीच लोकं त्या मुलाच्या आवाजाची आणि गाण्याची स्तुती करताना दिसले.

या व्हिडिओने अनेकांची मनं जिंकलीत. गाणं माणसाचा अक्षरशः कायापालट करू शकतात. मूड बदलू शकतात हे व्हिडिओतून दिसून येतं.

हा व्हिडिओ 2.6 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. इतकंच नाही तर लाखो लोकांनी या व्हिडिओला लाइक केलं आहे, तर हजारो लोकांनी या व्हिडिओवर कमेंट्सही केल्या आहेत.

कुणी मुलाच्या प्रतिभेचं कौतुक केलं, तर काहींनी धाडसाचं कौतुक केलं. अनेक युजर्स हार्ट इमोजी आणि फायर इमोजी पाठवताना दिसलेत.