Video | ढिंचॅक पूजाच्या नव्या गाण्याची चर्चा, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

सध्या ढिंचॅक पूजाचं आणखी एक गाणं समोर आलं आसून ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर तर ढिंचॅक पूजावर भन्नाट मीम्स पाहायला मिळत आहेत.

Video | ढिंचॅक पूजाच्या नव्या गाण्याची चर्चा, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
dhinchak pooja
| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 4:28 PM

मुंबई : ढिंचॅक पूजा या सोशल मीडिया एन्फ्लूएन्सरला कोण ओळखत नाही. तिच्या एका गाण्यामुळे ती रात्रीत स्टार झाली. नंतर तिच्या वेगवेगळ्या करामतींमुळे सोशल मीडियावरील वातावरण नेहमीच तापलेलं पाहायला मिळालेलं आहे. सध्या ढिंचॅक पूजाचं आणखी एक गाणं समोर आलं आसून ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर तर ढिंचॅक पूजावर भन्नाट मीम्स पाहायला मिळत आहेत. (new funny song of dhinchak pooja jaun main plane mein went viral on social media)

ढिंचॅक पूजाच्या नव्या गाण्याची चर्चा  

ढिंचॅक पूजाचं ‘जाऊं मैं प्लेन में’ हे नवं गाणं रिलीज झालं आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलवर तीने आपलं गाणं प्रदर्शित केलं आहे. या गाण्याला काही मिनिटांमध्ये लाखो लोकांनी पाहिलेलं आहे. ढिंचॅक पूजा या गाण्यात विमानात बसून गाणं गाताना दिसत आहे. पूजाचं हेच गाणं सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे.

पाहा ढिंचॅक पूजाचं नवं गाणं

गाणं रिलीज झाल्यानंतर मीम्सचा पाऊस

ढिंचॅक पूजाने तिचं गाणं रिलीज केल्यानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स शेअर केले जात आहेत. एका नेटकऱ्याने तर आता मला कोणतंही गाणं ऐकण्याची इच्छा नसल्याचं म्हटलंय. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने ढिंचॅक पूजाचे गाणे ऐकूण माझी कोणतीही शेवटची इच्छा राहिली नाही, असं मिश्किल भाष्य केलंय.

दरम्यान, ढिंचॅक पूजने आपल्या नव्या गाण्याबाबत 14 सप्टेंबर रोजी तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन अधिकृत घोषणा केली होती. यामध्ये तीने माझे नवे गाणे न विसरता ऐका असं म्हटलं होतं.

इतर बातम्या :

Video | मांजरीची कमाल, महिलेची केली हुबेहूब नक्कल, मजेदार व्हिडीओ पाहाच

VIDEO : मोबाईल हवा म्हणून माकडाने दाखवला समजूतदारपणा! व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्!

बास्केटबॉल खेळणारी खारुताई पाहिली आहे? व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल..!

(new funny song of dhinchak pooja jaun main plane mein went viral on social media)