AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेकडो किलोचे ओंडके ट्रकवर चढवण्यासाठी मजुरांची ‘आयडियाची कल्पना’, टीमवर्क पाहून नेटकरीही आवाक

कॉर्पोरेट जगतात टीमवर्कलाच ( workers' teamwork) सर्वाधिक महत्त्व आहे. त्याच प्रकारे, या मजुरांनीही सिद्ध केलं आहे की, एकीचं बळच मोठं असतं.

शेकडो किलोचे ओंडके ट्रकवर चढवण्यासाठी मजुरांची 'आयडियाची कल्पना', टीमवर्क पाहून नेटकरीही आवाक
workers' teamwork Viral Video
| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 11:05 AM
Share

आयुष्यात काही कामं अशी असतात, ज्यासाठी लोकांची मदत घ्यावी लागते. काही कामं एकमेकांच्या मदतीनेच शक्य होतात. असाच एक व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यात काही मजूर ट्रकवर ( truck) लाकूड ( wooden logs) चढवण्यासाठी काम करत आहेत. आपण पाहिले असेल की मोठ्या कॉर्पोरेट जगतात टीमवर्कलाच ( workers’ teamwork) सर्वाधिक महत्त्व आहे. त्याच प्रकारे, या मजुरांनीही सिद्ध केलं आहे की, एकीचं बळच मोठं असतं. ( The idea of abandoning the laborers to load the wooden logs on the truck. Video of workers’ teamwork goes viral )

बऱ्याचदा मजूर ट्रकवर लाकूड चढवण्यासाठी वेगवेगळे सर्वोत्तम मार्ग शोधत असतात. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कामगार ट्रकच्या दोन्ही बाजूला उभे आहेत. त्यांनी 2 मोठे ओंडके ट्रकच्या आधाराने उभे केले आहेत. त्यानंतर एका मोठ्या झाडाचे लाकूड त्यावर ते दोरीने बांधून ठेवतात. काही कामगार ट्रकच्या वर उभे राहून ते खेचत आहेत, तर काही ट्रकच्या खालून तो ओंडका ढकलत आहेत. कामगारांचे हे टीम वर्क नेटकऱ्यांना भलतंच आवडलेलं दिसतं आहे.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. व्हिडिओखाली कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहलं आहे की, ‘व्हॉट अॅन आयडिया सर जी’ दुसर्‍याने लिहिलं आहे की, ‘इतके सुंदर उदाहरण .. टीमवर्कसह काहीही साध्य करता येते’ तिसऱ्याने व्हिडिओवर लिहिलं आहे की, ‘सध्याच्या जगात असं एकीचं बळ क्वचितच पाहायला मिळतं, हा व्हिडिओ खूप मस्त आहे ‘या व्यतिरिक्त, इतर नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर महान, उत्तम, चांगले प्रयत्न सारखे कमेंट केल्या आहेत, तर काहींनी आश्चर्याचे इमोजीज ट्विट केले आहेत.

हा व्हिडीओ @THEJES_IFS18 नावाच्या नेटकऱ्यानेन शेअर केला आहे. जो आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडताना दिसतो आहे.

हेही वाचा:

महादेवाच्या मंदिरात झोपला होता मुलगा, अचानक कोब्रा त्याच्या चादरीत शिरला, आणि त्यानंतर…

Video | मुलाला रडण्यासाठी जबरदस्ती, लाईकसाठी महिलेचा कारनामा, व्हिडीओ व्हायरल झाल्याने ट्रोल

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.