महादेवाच्या मंदिरात झोपला होता मुलगा, अचानक कोब्रा त्याच्या चादरीत शिरला, आणि त्यानंतर…

एक व्यक्ती मंदिरात गाढ ( Shiv Temple ) झोपेत आहे, त्याने अंगावर चादर घेतली आहे. काही वेळानंतर एक कोब्रा साप ( Cobra Snake ) जमिनीवर रेंगाळत तिथं येतो आणि त्या व्यक्तीच्या चादरीत शिरतो.

महादेवाच्या मंदिरात झोपला होता मुलगा, अचानक कोब्रा त्याच्या चादरीत शिरला, आणि त्यानंतर...


बांसवाडा: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल ( Viral Video ) होत असतात. काही मजेदार असतात तर काही आश्चर्यकारक. आता एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या अंगावर शहारे नक्कीच उभे राहतील. या व्हिडीओत, एक व्यक्ती मंदिरात गाढ ( Shiv Temple ) झोपेत आहे, त्याने अंगावर चादर घेतली आहे. काही वेळानंतर एक कोब्रा साप ( Cobra Snake ) जमिनीवर रेंगाळत तिथं येतो आणि त्या व्यक्तीच्या चादरीत शिरतो. या दरम्यान, हा मुलगा खूप गाढ झोपेत आहे, ज्यामुळे त्याला साप अजिबात जाणवत नाही. ( The cobra crawled into the bed sheet of a boy sleeping in the temple, viral video )

हे प्रकरण राजस्थानच्या बांसवाडाच्या मंदारेश्वर महादेव मंदिर परिसरातील आहे. ही घटना मंदिरात रात्री बाराच्या सुमारास घडली. याचा पुरावा म्हणजे सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड केलेली ही क्लिप, जी आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्यक्तीचे नाव जय उपाध्याय असं सांगितले जात आहे, जो काही दिवसांपासून मंदिरात झोपत होता, मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा जयला कळले की, त्याच्या चादरीमध्ये साप आहे, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली

कोब्रा साप अंथरुणावर दिसतो

मीडियाशी बोलताना जयने सांगितलं की- ही घटना रविवारी रात्री घडली. त्या रात्री मी मंदिराच्या आवारात जमिनीवर चटईवर झोपलेलो होतो. रात्री 12 च्या सुमारास मला माझ्या अंथरुणात काहीतरी विचित्र वाटले. म्हणून मी वळलो आणि झोपी गेलो. थोड्या वेळाने मला पुन्हा तसंच काहीतरी जाणवलं. तो साप माझ्या पायाभोवती घुटमळत होता. अचानक मी ब्लँकेट फेकले आणि उभा राहिलो, तेव्हा मला अंथरुणात कोब्रा साप दिसला, जे पाहून मी खूप घाबरलो. मी तुम्हाला सांगतो की, साप माझ्या चादरीमध्ये बराच काळ होता, परंतु त्याने मला इजा केली नाही.

जयने पुढे सांगितले की, त्याला असे वाटते की महादेवानेच त्याला प्रकट होऊन दर्शन दिले. त्या दिवशी रात्री 12 नंतर रविवार संपला होता आणि सोमवार होता. सोमवार हा महादेवाचा दिवस आहे. याच विश्वासामुळे तो दररोज मंदिरात झोपायचा. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून अनेक लोक देवाने दर्शन दिल्याचं सांगत आहेत, तर अनेकजण सांगतात की, नशीब बलवत्तर होतं म्हणून या मुलाला साप चावला नाही

 

हेही वाचा:

‘तमंचे पे व्हिडीओ करणं’ महिला पोलिसाला भोवलं, राजीनामा दिल्यानंतर पोलिसांकडून 1 लाख 82 हजाराच्या भरपाईची नोटीस

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI