AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | मुलाला रडण्यासाठी जबरदस्ती, लाईकसाठी महिलेचा कारनामा, व्हिडीओ व्हायरल झाल्याने ट्रोल

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील महिला यूट्यूबर आहे. तसेच ती इंस्टाग्रामवरही सक्रिय असते. या महिलेचे यूट्यूबवर लाखोंनी सबस्क्रायबर आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी या महिलेचा एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Video | मुलाला रडण्यासाठी जबरदस्ती, लाईकसाठी महिलेचा कारनामा, व्हिडीओ व्हायरल झाल्याने ट्रोल
VIRAL VIDEO
| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 7:48 AM
Share

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडिओंना पाहून आपण हैराण होतो. सध्या तर यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर लाईक मिळवण्यासाठी आपल्या मुलाला रडवण्याचा आग्रह करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकरी या महिलेला चांगलंच ट्रोल करत आहेत. jordan cheyenne असं या तीस वर्षीय महिलेचं नाव असून ती मूळची अमेरिकेची आहे. (women delete her youtube channel who is asking her boy to cry for like and subscribe video went viral on social media)

लाईकसाठी मुलाला रडण्याची जबरदस्ती

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील महिला यूट्यूबर आहे. तसेच ती इंस्टाग्रामवरही सक्रिय असते. या महिलेचे यूट्यूबवर लाखोंनी सबस्क्रायबर आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी या महिलेचा एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये महिला आपल्या मुलासोबत कारमध्ये बसली होती. तसेच ती आपल्या मुलाला रडण्याचा आग्रह करत होती. या महिलेचा हाच व्हिडिओ नंतर व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी महिलेला चांगलेच सुनावले.

महिलेवर अकाऊंट डीलिट करण्याची वेळ 

व्हायरल झालेला व्हिडिओमध्ये महिला आमचा पाळीव कुत्रा आजारी असल्यामुळे आम्हाला दुःख झाले आहे, असे सांगत होती. लाईक आणि सबस्क्राईब मिळवण्यासाठी ही महिला सगळं काही नाटक करत होती. नंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर महिलेला आपले युट्युब तसेच इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करावे लागले. ट्रोलिंग वाढल्यामुळे महिलेने हा निर्णय घेतला.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडिओ महिलेने आपल्या सोशल अकाउंट वरून डिलीट केलेला असला तरी सध्या तो विविध माध्यमातून व्हायरल होत आहे. jordan cheyenne  या महिलेचा कारनामा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

इतर बातम्या :

Video | कामावर असताना डोकं फिरलं, पठ्ठ्याने जेसीबीच्या मदतीने ट्रकचा केला चुराडा, व्हिडीओ व्हायरल

Video | पतीशी अनैतिक संबध असल्याचा संशय, महिलेची ऑफिसमध्ये जाऊन बहिणीला मारहाण

‘तमंचे पे व्हिडीओ करणं’ महिला पोलिसाला भोवलं, राजीनामा दिल्यानंतर पोलिसांकडून 1 लाख 82 हजाराच्या भरपाईची नोटीस

(women delete her youtube channel who is asking her boy to cry for like and subscribe video went viral on social media)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.