Viral Video : नवजात बाळाच्या चेहऱ्यावर मिश्या, व्हिडिओ झाला व्हायरल, बाळाचे आई – बाबा म्हणाले…..
सोशल मीडियावर प्रौढ व्यक्तीसारख्या गडद मिशा आणि दाढी असलेल्या एका नवजात बाळाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. नवजात बाळांच्या अंगावर 'लॅनुगो' नावाचे बारीक केस असणे नैसर्गिक असले, तरी या व्हिडिओमधील स्पष्ट मिशांमुळे नेटकऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे.

सोशल मिडीयावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. आता एका नवजात बाळाचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. या बाळाच्या चेहऱ्यावर चक्क मोठ्या माणसांसारख्या मिशा दिसत आहेत. व्हिडिओमध्ये बाळ रूग्णालयातील बेडवर पांघरूणात गुंडाळलेलं दिसतं. ते डोळे उघडतं, मान हलवतं आणि चेहऱ्यावरील मिशांमुळे लोकांच लक्ष वेधून घेतं. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं, तर काहींनी थेट हा AI चा प्रकार असल्याता संशय व्यक्त केला आहे.
बाळाच्या मिश्या पाहून नेटकऱ्यांना प्रश्न
या व्हिडिओमध्ये बाळाच्या वरच्या ओठावर गडद रंगाचे केस दिसत आहेत. हनुवटीवरही केस असल्यासारखं दिसतं. त्यामुळे बाळाचा चेहरा एखाद्या प्रौढ व्यक्तीसारखा दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तो काही मिनिटांतच व्हायरल झाला.
काही नेटकऱ्यांनी या बाळाच्या चेहऱ्यावरच्या केसांबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर काहींनी व्हिडिओ AI च्या मदतीने तयार केला असावा असं म्हणतं आहेत. व्हिडिओमध्ये बाळाच्या हालचाली आणि चेहऱ्यावरील केस पाहून नेटकऱ्यांना हा व्हिडिओ खरा आहे की नाही याची शंका येत आहे.
खरंच नवजात बाळाच्या चेहऱ्यावर मिशा येऊ शकतात का?
नवजात बाळांच्या शरीरावर बारीक केस असू शकतात. या केसांना ‘लॅनुगो’ असं म्हणतात. गर्भावस्थेत बाळाच्या शरीरावर हे मऊ, बारीक केस तयार होतात. जन्मानंतर ते अनेकदा गळून पडतात. मात्र या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या गडद आणि स्पष्ट मिशा नैसर्गिक आहेत की डिजीटल पद्धतीने तयार केल्या आहेत. हे केवळ व्हिडिओ पाहून ठरवता येत नाही.
व्हिडिओबाबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो नेमका कुठे आणि कधी शूट करण्यात आला आहे. हे स्पष्ट झालेलं नाही. सोशल मीडियावर काही जण व्हिडिओ खरा असल्याचा दावा करत आहेत तर काही जण तो AI च्या मदतीने तयार केला किंवा बददला असल्याचं सांगत आहेत. मात्र या बाळाच्या जन्माची किंवा व्हिडिओच्या सत्यतेची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.