AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : अल्बेनियामध्ये भारताचे 1000 रुपये किती होतात?

युरोपीयन देश असलेल्या अल्बेनियाची राजधानी तिरानामध्ये सध्या जोरदार आंदोलन सुरू आहे. नागरिक रस्त्यावर उतरले असून आंदोलन चांगलंच पेटलं आहे, त्यामुळे सध्या संपूर्ण जगाचं लक्ष या देशाकडे वेधलं गेलं आहे.

GK : अल्बेनियामध्ये भारताचे 1000 रुपये किती होतात?
indian rupeeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 24, 2026 | 4:23 PM
Share

युरोपीयन देश असलेल्या अल्बेनियाची राजधानी तिरानामध्ये सध्या जोरदार आंदोलन सुरू आहे. नागरिक रस्त्यावर उतरले असून जाळपोळ सुरू आहे, दंगल पेटली आहे. देशात वाढलेल्या भ्रष्टाचार, विद्यापीठांची खराब स्थिती आणि प्रचंड प्रमाणात आकारली जाणारी फी याविरोधात विद्यार्थ्यांसह नागरिकांकडून जोरदार आंदोलन सुरू आहे. आंदोलकांकडून अल्बनियाचे पंतप्रधान एदी रामा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज सुरू असून, आंदोलकांकडून देखील पोलिसांवर दगडफेक सुरू आहे. या आंदोलनामध्ये आतापर्यंत अनेकजण जखमी झाले आहेत. या आंदोलकांकडून पेट्रोल बॉम्ब देखील फेकले जात असून, अल्बनियानामधील परिस्थिती तेथील सरकारच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्यामुळे आता संपूर्ण जगाचं लक्ष या आंदोलनाकडे लागलं आहे. दरम्यान हा देश आता अचानक चर्चेमध्ये आल्याने येथील अर्थव्यवस्था किती मजबूत आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता देखील अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे.

अल्बेनियामध्ये भारताचे 1000 रुपये किती होतात?

अल्बेनियाच्या अधिकृत करन्सीला अल्बानियाई लेक असं म्हटलं जातं. अल्बेनियन मुद्रा असलेल्या एक लेकची किंमत जवळपास 1.17 भारतीय रुपये एवढी आहे. अल्बेलियन लेक आणि भारतीय रुपयामध्ये एवढा काही फार फरक नाहीये. अल्बानियाई लेकची किंमत ही भारतीय चलन असलेल्या रुपयापेक्षा थोडी अधिक आहे. भारताचे एक हजार रुपये अल्बेनियामध्ये जवळपास 855 लेक एवढे होतात.

भारतीय रुपया आणि अल्बेनियन लेकमध्ये फार काही फरक नसल्यामुळे भारतीय व्यापाऱ्यांना तिथे व्यापार करणं देखील अधिक सोईचं होतं. तसेच पैशांचा हिशोब ठेवणं देखील अधिक सोपं होतं. उदाहरण द्यायचं झालं तर समजा भारतीय बाजारात एखादी वस्तू 100 रुपयांना मिळत असेल तर तीच वस्तू अल्बनियामध्ये 117 रुपयांना मिळते. दरम्यान सध्या मात्र अल्बेनियामध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांसह नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. देशात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून, शिक्षणाची बिकट अवस्था झाली आहे. विद्यापीठांकडून प्रचंड प्रमाणात फी आकाराली जात आहे. याविरोधात आता तेथील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे.

Follow Us
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...
एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं....
Manoj Jarange On Viral Clip : एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं; जरांगेंचा दावा, महायुतीत पुन्हा खळबळ
हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला
Prasad Lad On Sanjay Raut : हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला; ऑडिओ क्लिपवरून राजकीय घमासान
500 कोटींची ऑडिओ टेप भाजपच्या आमदारानं फोडली संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Jarnage Viral Audio Clip : 500 कोटींची ऑडिओ टेप भाजपच्या आमदारानं फोडली संजय राऊतांचा गंभीर आरोप; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ