महिला अँकरने लाइव्ह टीव्हीवर केली घटस्फोटाची घोषणा, जाणून घ्या अचानक असं काय घडलं!

लाइव्ह टीव्हीवरील पॅनेल डिबेटदरम्यान या महिला अँकरने घटस्फोटाची घोषणा केली. अँकरचं बोलणं ऐकून तिथे उपस्थित पाहुण्यांना तर आश्चर्य वाटलंच, पण...

महिला अँकरने लाइव्ह टीव्हीवर केली घटस्फोटाची घोषणा, जाणून घ्या अचानक असं काय घडलं!
News Anchor
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 12, 2023 | 12:58 PM

‘व्हॅलेंटाईन वीक’च्या दिवशी लोक आपल्या प्रेमाचा जल्लोष करत असतानाच एका महिला अँकरची धक्कादायक कहाणी समोर आली आहे. लाइव्ह टीव्हीवरील पॅनेल डिबेटदरम्यान या महिला अँकरने घटस्फोटाची घोषणा केली. अँकरचं बोलणं ऐकून तिथे उपस्थित पाहुण्यांना तर आश्चर्य वाटलंच, पण हजारोंच्या संख्येने ही घोषणा ऐकणाऱ्या प्रेक्षकांनाही अखेर काय झालं असा प्रश्न पडला. खरं तर हे प्रकरण ज्युली बंडारेस नावाच्या अँकरशी संबंधित आहे. इंडिपेंडंटच्या एका ऑनलाइन रिपोर्टनुसार, ही महिला अँकर अमेरिकन चॅनेल फॉक्स न्यूजशी संबंधित आहे. हा सगळा प्रकार लाइव्ह डिबेटदरम्यान घडला आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे या घोषणेपूर्वी तिने ट्विटरवर आपला एक फोटो शेअर केला होता आणि कॅप्शन लिहिले होते की आज रात्री 11 वाजता शोच्या शेवटी माझी एक छोटीशी घोषणा आहे.

तिच्या या ट्विटनंतर प्रेक्षक ती काय घोषणा होणार याबद्दल अंदाज बांधत होते पण घटस्फोटाचा विचार कोणीही करत नव्हतं. जेव्हा तिचा शो सुरू झाला तेव्हा मोठ्या संख्येने प्रेक्षक टीव्हीच्या पडद्याकडे बघत होते की काय घोषणा होणार आहे.

शोच्या होस्टने ज्युलीला व्हॅलेंटाईन डेला तिच्या पतीकडून काही मिळतंय का, असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना ज्युली लाइव्ह टीव्हीवर म्हणाली- “तिचा घटस्फोट होत आहे.”

ज्युली म्हणाली की, ती आता पुढे जात आहे सर्वांचे आभार. इतकंच नाही तर ही ब्रेकिंग न्यूज असल्याचंही ज्युलीने म्हटलं आहे. तिच्याच्यात आणि तिच्या जोडीदारामध्ये बऱ्याच काळापासून दुरावा असल्याच्या बातम्या येत होत्या आणि लोकांना याबद्दल स्पष्ट संदेश मिळावा म्हणून तिने लाईव्ह टीव्हीवर ही घोषणा केली आणि सर्वांना याची जाणीव झाली.