
साल २०१७ हा एक व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात कथितपणे थायलंडच्या विमानतळावर भूतांच्या आकृत्या एअरोब्रिजवरुन चालताना दिसत आहेत. काही सेकंदाच्या या व्हिडीओ नेटीजन्समध्ये दहशत आणि मानसिक धक्का अशा संमिश्र भावना दिसत आहेत. या व्हिडीओत तरंगत लोक विमानातून बाहेर पडताना दिसत आहेत. जे वास्तवात तेथे नव्हतेच, कारण हा एअरोब्रिज विमानाला जोडलेला दिसतच नाहीए…
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ संदर्भात असा दावा केला जात आहे की हा थायलंडचा फुकेत इंटरनॅशनल एअरपोर्टवर झालेल्या अपघातात मृतांचे आत्मा आहेत. अनेक नेटिजन्स या व्हिडीओला १६ सप्टेंबर २००७ च्या वन-टु-गो एअरलाईन्सच्या फ्लाईट २६९ अपघाताशी जोडत आहेत. या अपघातात ९० लोक ठार झाले होते.
@scaryencounter नावाच्या इंस्टाग्राम हँडलवरुन हा व्हिडीओ पुन्हा शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत अनेक नेटीजन्सने या भयानक अपघातातील हे प्रेतात्मे असल्याचे म्हटले आहे.
एका युजरने कमेंट केली आहे की ते हवेत लटकत आहेत. त्यांना माहिती नाही ते मेलेले आहेत. ते वारंवार एकच काम करत आहेत. जे त्यांनी काचा तुटण्याच्या आधी केले होते. दुसऱ्या एका नेटीजन्सने म्हटले की निरखून पाहीले की समजते की चालत नाहीएत.हवेत तरंगत आहेत. तरीही या व्हिडीओचे सत्य मात्र वेगळेच आहे.
दि सन या वृत्तपत्रात 2017 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार व्हिडीओत जी भूताची सावली दिसत आहे. ती एक ऑप्टीकन इल्युझन आहे. या वृत्तात म्हटले आहे की या व्हिडीओत जे तरंगताना लोक दिसत आहेत ती वास्तविक एअरोब्रिजच्या चमकदार काचांवर एअरपोर्टचा प्रकाश आणि तेथील लोकांचे प्रतिबिंब आहे.