Video Viral : वय झालं तरी बायकोची आवड जपतोय! आजोबा स्वतः दुकानात जाऊन निवडत आहेत बांगड्या, व्हिडीओ पाहून नेटकरीही खुश
एका आजोबांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. आजोबा आपल्या बायकोला घेऊन बांगड्यांच्या दुकानात पोहोचले. बायकोला कोणत्या बांगड्या आवडतात, रंग कसा हवा. याची दुकानदाराकडे विचारपूस करतात. यावरून प्रेमाला वयाचं बंधन नसतं हे स्पष्ट होत आहे,

प्रेम व्यक्त करायला वयाचं बंधन नसतं. एका आजोबांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. आजोबा आपल्या बायकोला घेऊन बांगड्यांच्या दुकानात पोहोचले. बायकोला कोणत्या बांगड्या आवडतात, रंग कसा हवा. याची दुकानदाराकडे विचारपूस करत आहेत. हे सगळं पाहून दुकानादारातील लोकांनाही हसू आवडले नाही. हा प्रेमळ व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक वृद्ध जोडपं बांगड्यांच्या दुकानात असल्याचं दिसतं. आजोबा दुकानदाराला आपल्या बायकोसाठी लाल रंगाच्या बांगड्या दाखवण्यासाठी सांगतात. ते वेगवेगळे डिझाईन्स पाहतात. बांगड्या कशा हव्यात, याबद्दलही ते दुकानदाराशी चर्चा करताना दिसत आहेत.
&n
तिकडे आजीही शांतपणे बाजूला उभ्या राहून आपली आवड सांगत आहेत. हातात किती बांगड्या हव्यात, कोणत्या प्रकारच्या हव्यात याबद्दल त्या आजोबांना समजावून सांगतात. बायकोसाठी बांगड्यांच्या दुकानात जाणं तिच्या आवडीच्या बांगड्या निवडणं हा अंदाज अनेकांना आवडलाय. हा व्हिडिओ एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून व्हायरल झाला आहे. त्यासोबत ‘वय झालंय, पण प्रेमाचा रंग अजूनही गडद आहे’ अस सुंदर कॅप्शन देण्यात आलं आहे.
नेटकरी म्हणाले प्रत्येकाला मिळावं
हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलं, ‘आज दुकानदारही प्रेमाचा अर्थ शिकला असेल. तर दुसऱ्याने म्हटलंय की, ‘ मला सुद्धा असेच प्रेम हवे आहे. थोडक्यात काय तर तरूणपणी प्रेम व्यक्त करणं सोपं असतं. पण संसाराची इतकी वर्ष सोबत घालवल्यानंतरही बायकोची आवड लक्षात ठेवणं, तिच्यासाठी स्वत:हून काहीतरी निवडणं, यातच खरं प्रेम दिसतं.