Political Viral: चला बघुयात झाडी, डोंगार, हाटील राजकीय मिम्स वगैरे वगैरे…

इंटरनेटवर लोकांनी मोठ्या प्रमाणात सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल शेअर केलंय. प्रचंड प्रमाणात गोष्टी व्हायरल होतायत.

Political Viral: चला बघुयात झाडी, डोंगार, हाटील राजकीय मिम्स वगैरे वगैरे...
व्हायरल!
Image Credit source: Twitter
| Updated on: Jun 28, 2022 | 4:06 PM

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबतचे आमदार (MLA) दूर गावाहाटीत आहेत. मात्र या बंडामुळे महाराष्ट्रात शिवसैनिकांनी रान पेटवलं आहे. शिवसैनिकांनी कुणाचं ऑफीस फोडलं. तर कुणाच्या पुतळ्यांची जाळपोळ केलीय. तर कुणाच्या पोस्टरला काळं फासलं आहे. एकनाथ शिंदेविरुद्ध मुख्यमंत्री ठाकरे संघर्ष चांगलाच पेटला आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. नवी मुंबईत जाळपोळ झाल्याने तणाव निर्माण झाला आहे. खारघर येथे शिवसेनेकडून (Shivsena) आंदोलन करण्यात आले. एकनाथ शिंदेसह त्यांच्यासह गेलेल्या बंडखोर आमदारांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. इंटरनेटवर लोकांनी मोठ्या प्रमाणात सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल शेअर केलंय. प्रचंड प्रमाणात गोष्टी व्हायरल होतायत. एक नजर टाकुयात व्हायरल गोष्टींवर…

1) शाब्बास एकनाथा असं बाळासाहेब ठाकरे म्हणतायत

2) हिरोपंतीचा डायलॉग

3)  शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं वर्णन केलंय या मिममध्ये

4) हा जुना व्हिडीओ ज्यात हे बाबा एकनाथ शिंदेंना चांगलं ओळखतात असं लोकं म्हणतायत

5) संजय राऊत हिशोब लावताना

6) लोकांनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं सध्याचं वर्णन केलंय

7) झाडी, डोंगार, हाटील परदेशात चर्चा !

(आमचा कुठल्याही पक्षाला पाठिंबा नाही. बातमी मनोरंजाच्या हेतूने करण्यात आलेली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)