Bank Strike News : आजपासून तीन दिवस बँका बंद राहणार होत्या, पण..बँक युनियन्सचा चांगला निर्णय
Bank Strike News : बँक यूनियन्सनी आजपासून म्हणजे 28 सप्टेंबरपासून तीन दिवसीय संप पुकारला होता. पण काल रात्री 9.30 वाजता IBA आणि UFBU दरम्यान बैठक झाली असं UFBU ने सांगितलं.

सर्वसामान्यांसाठी एक चांगली बातमी आहे. बँक यूनियन्सचा आजपासून म्हणजे 28 सप्टेंबरपासून सुरु होणारा तीन दिवसीय संप रद्द झाला आहे. बँक यूनियन्सनी 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंतचा प्रस्तावित तीन दिवसीय संप मागे घेतला आहे. आजही बँका सुरु राहतील. 27 सप्टेंबरच्या रात्री इंडियन बँक्स असोशिएशन आणि UFBU च्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. 27 सप्टेंबरला रात्री 9.30 वाजता IBA आणि UFBU दरम्यान बैठक झाली असं UFBU ने सांगितलं. बैठकीत व्यापक चर्चा झाल्यानंतर ठरवण्यात आलं की, शनि्वारी सुट्टी जाहीर करण्याच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती बनवण्यात येणार आहे. UFBU नुसार, ही समिती सर्व संभाव्य पर्यायांवर आणि सर्व संबंधित पक्षांशी चर्चा करेल. मार्ग काढणं हा समितीचा उद्देश असेल. सर्व स्टेकहोल्डर्स खासकरुन बँक ग्राहकांची गरज सुद्धा लक्षात घेतली जाईल.
स्केल IV आणि त्यावरच्या अधिकाऱ्यांसाठी परफॉर्मेंस लिंक्ड इंसेंटिव (PLI) योजनेवरही चर्चा झाली. UFBU नुसार यूनियन्स आणि असोशिएशनच्या चिंता ध्यानात घेऊन PLI योजनेतील बदलांचा प्रस्ताव सरकार समक्ष ठेवण्यासाठी IBA सोबत चर्चा सुरु केली जाऊ शकते. 8 मार्च 2024 च्या मिनट्समधील नमूद असलेल्या लिस्टेड मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच चर्चा केली जाईल. या सर्व आश्वासनांनंतर बँक यूनियन्सची संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. याआधी 11 सप्टेंबरला एकदिवसीय संप झाला होता. आज म्हणजे सोमवारपासून बँकांनी पुन्हा तीन दिवसीय संपाची घोषणा केली होती. पण रविवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर संप टाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?
UFBU अंतर्गत बँकांच्या काही खास मागण्या आहेत. त्यांची मुख्य मागणी आहे की, बँकांचं कामकाज पाच दिवसांचं व्हावं. याचा अर्थ शनिवार-रविवारी सुट्टी जाहीर करणं. यूनियन्सच म्हणणं आहे की यावर आधी चर्चा झाली आहे. पण निर्णय झालेला नाही. चांगल्या पेन्शन बेनिफिटची सुद्धा मागणी आहे. NPS कर्मचाऱ्यांना पुन्हा स्विच करण्याचा ऑप्शन मिळाला पाहिजे. जुनी पेंशन स्कीम पुन्हा मिळाली पाहिजे. प्रलंबित वेतन संशोधन सुद्धा लवकर झालं पाहिजे. परफॉर्मन्सशी संबंधित इंसेंटिव मुद्यांवर सुद्धा लवकर तोडगा काढला पाहिजे
