यात RISE मध्ये RICE शोधून दाखवा! ज्याला उत्तर सापडेल तोच हुशार

सरावाशिवाय कोणताही तुर्रम खान मेंदूचा टीझर वेळेत सोडवू शकणार नाही. आज जर तुम्हाला हा ऑप्टिकल भ्रम आवडला असेल तर कमेंट करून आम्हाला जरूर कळवा. असेच रंजक कोडे आम्ही रोज तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत.

यात RISE मध्ये RICE शोधून दाखवा! ज्याला उत्तर सापडेल तोच हुशार
optical illusion
| Updated on: Aug 24, 2023 | 4:22 PM

मुंबई: एखादे चित्र पाहून जर तुम्ही गोंधळून जात असाल तर समजा की तुम्ही ऑप्टिकल भ्रम किंवा मेंदूचा टीझर पाहिलाय. अशी चित्रे अनेकदा आपल्याला गोंधळात टाकतात. खरं तर यात काही गोष्टी लपलेल्या असतात ज्या आपल्याला शोधून काढायच्या असतात. आज आम्ही पुन्हा तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग ब्रेन टीझर घेऊन आलो आहोत. यामध्ये तुम्हाला एक वेगळा शब्द शोधायचा आहे, ज्यासाठी तुम्हाला फक्त 7 सेकंद मिळतील.

आज आम्ही जी ऑप्टिकल इल्युजन टेस्ट घेऊन आलो आहोत. ती वाचकांना राइज शब्दांच्या गटात लपलेला राइस हा शब्द शोधण्याचे आव्हान देते. तज्ञांचा असा विश्वास आहे की असे कोडे सोडविल्यास आपली संज्ञानात्मक क्षमता, टीकात्मक विचार आणि निरीक्षण कौशल्य सुधारू शकते. इतकंच नाही तर यामुळे तुम्हाला तणावापासून मुक्ती मिळते, ज्यामुळे उत्पादकता वाढू शकते. सुधारणेसाठी नियमित सराव आवश्यक असतो. ऑप्टिकल इल्युजनचा सराव असणं फार महत्त्वाचं आहे. चला तर मग याचं उत्तर सांगा.

ब्रेन टीझर किंवा ऑप्टिकल भ्रमने अनेक फायदे होतात. मेंदूचा व्यायाम होतो. निरीक्षण कौशल्य चांगले होते. एखाद्या गोष्टीचं पटकन उत्तर शोधण्याची सवय लागते. हे चित्र नीट बघा, या चित्रात राइस हा लपलेला शब्द पाहिलात का? उत्तर होय असेल तर अभिनंदन. सापडत नसेल तर निराश होण्याची गरज नाही. आम्ही खाली उत्तर देत आहोत.