AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलिसांची मोठी कारवाई, माओवाद्यांचे 2 मोठे तळ उद्ध्वस्त

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती भागातील अबुझमाडच्या जंगलात झालेल्या भीषण चकमकीत ६ माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या मोहिमेत गडचिरोली सी-६० पथकाचे जवान दीपक चिन्ना मडावी शहीद झाले असून पोलिसांनी माओवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केले आहेत.

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलिसांची मोठी कारवाई, माओवाद्यांचे 2 मोठे तळ उद्ध्वस्त
Gadchiroli Police
| Updated on: Feb 06, 2026 | 12:35 PM
Share

महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातील अबुझमाडच्या घनदाट जंगलात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली आहे. या चकमकीत गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६० पथकातील जवान दीपक चिन्ना मडावी यांना वीरमरण आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या चकमकीत पोलिसांनी ६ माओवाद्यांना कंठस्नान घातले असून त्यांचे दोन महत्त्वाचे तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहेत.

३ फेब्रुवारीपासून मोहिमेला सुरुवात

मिळालेल्या माहितीनुसार, भामरागड तालुक्यातील फोदेवाडा आणि सॅन्ड्रा-मांडरा परिसरातील जंगलात माओवाद्यांच्या कंपनी क्रमांक १० चे सदस्य आणि छत्तीसगडमधील काही जहाल माओवादी एकत्र आल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सी-६० कमांडो, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि जलद प्रतिसाद पथकाने ३ फेब्रुवारीपासून संयुक्त नक्षलविरोधी मोहीम हाती घेतली होती.

चकमकीचा घटनाक्रम

यानंतर काल ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास अबुझमाडच्या जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी पोलीस पथकावर जोरदार गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही याला चोख प्रत्युत्तर दिले. या पहिल्या चकमकीत एका माओवाद्याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. यावेळी चकमक थांबली असे वाटत असतानाच सायंकाळच्या सुमारास पुन्हा जोरदार गोळीबार झाला.

या दुसऱ्या चकमकीत सी-६० जवान दीपक चिन्ना मडावी (३८) आणि जोगा मडावी हे दोन जवान जखमी झाले. जखमी जवानांना तातडीने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने भामरागड येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दीपक मडावी यांना गंभीर जखम झाल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तर जखमी जोगा मडावी यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर गडचिरोलीत उपचार सुरू आहेत.

यानंतर आज (६ फेब्रुवारी) सकाळी पुन्हा एकदा या परिसरात शोधमोहीम (Search Operation) राबवण्यात आले. यावेळी चकमकीच्या ठिकाणावरून एका महिला माओवाद्यासह आणखी दोन पुरुष माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले. अशाप्रकारे या मोहिमेत आतापर्यंत एकूण ३ माओवादी ठार झाले आहेत. यावेळी घटनास्थळावरुन AK-47 रायफल, SLR रायफल, मोठ्या प्रमाणात काडतूस आणि स्फोटके आणि दैनंदिन वापराचे माओवादी साहित्य जप्त केले आहे.

दरम्यान अबुझमाडचा हा परिसर भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम आणि घनदाट आहे. चकमकीनंतर अनेक माओवादी जखमी अवस्थेत जंगलाचा फायदा घेऊन पळाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे या परिसरात अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली असून कोम्बिंग ऑपरेशन अधिक तीव्र करण्यात आले आहे. शहीद जवान दीपक मडावी यांच्या बलिदानामुळे संपूर्ण गडचिरोली पोलीस दलासह त्यांच्या मूळ गावी (अहेरी) शोककळा पसरली आहे.

Follow Us
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?