चला उत्तर शोधा! कोड्याचं उत्तर सांगा

ऑप्टिकल भ्रमामुळे नेटिझन्सचा चांगलाच गोंधळ उडाला आहे. लोकांना जे दिसतंय ते खरंच आहे की नाही हे समजत नाही.

चला उत्तर शोधा! कोड्याचं उत्तर सांगा
optical illusion viral
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 13, 2022 | 6:01 PM

‘ऑप्टिकल इल्युजन’ म्हणजे एक प्रकारचा भ्रम. खरंतर पाहताच क्षणी मन भरकटेल, यासाठीच अशा फोटोंची रचना केलेली असते. हे स्केचेस, पेंटिंग्ज, सामान्य चित्र किंवा कोणत्याही स्वरूपात हे चित्र असू शकते. जर तुम्हालाही ऑप्टिकल भ्रम सोडवण्याचा आनंद मिळत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी असेच एक मनोरंजक चित्र घेऊन आलो आहोत. या ऑप्टिकल भ्रमामुळे नेटिझन्सचा चांगलाच गोंधळ उडाला आहे. लोकांना जे दिसतंय ते खरंच आहे की नाही हे समजत नाही.

व्हायरल फोटोमध्ये हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या बॅकग्राऊंडच्या वर प्लस साइनपासून बनवलेली जाळी तुम्ही पाहू शकता. शिवाय पांढऱ्या, लाल आणि निळ्या रंगात चिन्ह दिसेल, ज्यामुळे जबरदस्त भ्रम निर्माण झाला आहे.

उदा., या चित्राकडे बारकाईने पाहिल्यावर रेषा वक्राकार दिसतील. आशा आहे की आपण त्या वक्र रेषा देखील पाहू शकाल.

optical illusion viral

जर तुमच्याबाबतीतही असंच काही घडत असेल तर सांगा चित्रात किती वक्राकार रेषा आहेत? तसे पाहिले तर चित्रात कोणती रेषा वक्र आहे, याचा अंदाज बहुतेकांना येत नाही.

हे चित्र ऑप्टिकल भ्रमाचे एक उत्तम उदाहरण आहे. हेच कारण आहे की लोक ते पाहिल्यानंतर भ्रमात अडकतात. उदाहरणार्थ, ते जे पहात आहेत ते प्रत्यक्षात तिथे नाही.

वक्राकार रेषा म्हणजे फक्त तुमच्या डोळ्यांचा भ्रम आहे. प्रत्यक्षात या चित्रात एकही वक्राकार ओळ नाही. होय, तुम्ही बरोबर वाचले.