Optical Illusion | यात एक मांजर लपलीये, सांगा बरं कुठाय?

या फोटोत अनेक घुबड आहेत, पण घुबड सगळ्यांना दिसत आहेत. या घुबडांमध्ये लपलेली मांजर शोधायची आहे. जर आपण हे आव्हान 10 सेकंदात पूर्ण केले तर आम्ही समजू की आपण लपलेल्या गोष्टी शोधण्यात माहिर आहात. आपलं निरीक्षण कौशल्य चांगलं आहे.

Optical Illusion | यात एक मांजर लपलीये, सांगा बरं कुठाय?
Where is the cat
| Updated on: Jun 13, 2023 | 11:36 AM

मुंबई: ऑप्टिकल भ्रम असलेली चित्रे इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. हे लोकांना गणित सोडविण्याचे आणि ते काहीतरी लपलेले शोधण्याचे आव्हान देते. या फोटोत अनेक घुबड आहेत, पण घुबड सगळ्यांना दिसत आहेत. या घुबडांमध्ये लपलेली मांजर शोधायची आहे. जर आपण हे आव्हान 10 सेकंदात पूर्ण केले तर आम्ही समजू की आपण लपलेल्या गोष्टी शोधण्यात माहिर आहात. आपलं निरीक्षण कौशल्य चांगलं आहे.

जर तुम्हाला खरोखरच मांजर शोधायचे असेल तर हे चित्र काळजीपूर्वक पहा. म्हणजे कुठलाही कोपरा सोडू नका आणि हो, फोकस सुद्धा महत्वाचा आहे. कारण लक्ष विचलित झाले तर डोळ्यांसमोर असलेलं मांजरही दिसणार नाही. त्यामुळे काळजीपूर्वक बघा. हे मांजर तुमच्या डोळ्यासमोर आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. पण गोष्ट अशी की 2017 मध्ये जेव्हा हा फोटो एका फेसबुक पेजने शेअर केला तेव्हा हा फोटो व्हायरल झाला! आता पुन्हा एकदा हे चित्र लोकांची परीक्षा घेत आहे. मात्र, काही हुशार लोक असे आहेत ज्यांनी या फोटोमध्ये मिनिटापूर्वीच मांजरीला पाहिलं. पण जर तुम्हाला अजूनही मांजर दिसलं नसेल तर आम्ही खास तुमच्यासाठी खाली उत्तर दाखवत आहोत. खाली दिलेल्या लाल वर्तुळात मांजर आहे.

Here is the cat