मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हे अनेक प्रकारचे असतात. कधी यात आपल्याला काहीतरी लपलेलं शोधायचं असतं, कधी वेगळं जे आहे ते शोधून काढायचं असतं. कधी चुकीचं स्पेलिंग तर कधी दोन चित्रांमधील फरक शोधायचा असतो. ही कोडी सोडवताना निरीक्षण कौशल्य तपासलं जातं. मेंदूचा व्यायाम व्हावा म्हणून ही चित्रे रोज सोडवायला हरकत नाही. ऑप्टिकल भ्रम म्हणजेच एकप्रकारचे कोडे असते. लहानपणी आपण ही कोडी ऑफलाईन सोडवायचो. आता ही कोडी ऑनलाइन असतात. विशेष म्हणजे या कोड्यांची उत्तरं तुम्हाला लवकरात लवकर शोधायची असतात. दिलेल्या वेळात ही उत्तरे शोधून काढण्यासाठी तुम्ही तुमचं डोकं शांत करून मन एकाग्र केलंत तर त्याचा फायदा होऊ शकतो.
सध्या ऑप्टिकल भ्रमाचं हे चित्र खूप व्हायरल होतंय. या चित्रामध्ये एक जंगल दिसेल. या जंगलात खूप झाडे आहेत. या झाडांवर अस्वल आहेत. आता कोडं असं आहे की यात तुम्हाला खोटं अस्वल शोधायचं आहे. खोटं अस्वल शोधण्यासाठी तुमचं निरीक्षण चांगलं असायला हवं. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अस्वल कसं असतं हे माहित असायला हवं. ते जर एकदा तुम्हाला समजलं तर तुम्हाला खोटं अस्वल नक्कीच शोधता येईल. खरं आणि खोटं यात फरक शोधायचं असेल तर तुम्हाला खरं नेमकं कसं असतं हे आधी माहिती असायलाच हवं नाही का? जर तुम्ही कधीही अस्वल पाहिलं नसेल तर तुम्ही ते इंटरनेटवर सर्च करू शकता तुम्हाला नक्कीच मदत होईल.
चला, आता तुम्हाला खरं अस्वल माहित आहे. या चित्राकडे बघा, नीट निरखून पाहिल्यावर तुम्हाला खोटं अस्वल कळून चुकणारे. एक एक अस्वल नीट बघा, तुम्हाला खरं अस्वल माहित आहे. खरं अस्वल कळलं की दुसरं बघा, असं करत करत एक एक बघत जा आणि असंच तुम्हाला तुमचं उत्तर सापडेल. तुम्हाला उत्तर दिसलंय का? आम्ही तुम्हाला हिंट देतो, एक काम करा तुम्ही अस्वलाचा एक-एक अवयव बघत चला. डोळ्यांपासून सुरुवात करूयात…सगळ्या अस्वलांचे डोळे सारखेच आहेत का? या हिंट वरून तुम्हाला कदाचित याचं उत्तर सापडलं असेल. जर उत्तर दिसलं असेल तर अभिनंदन! खोटं अस्वल दिसलं नसेल तर काळजी करू नका, आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.