Optical Illusion | या चित्रात लपलेली मगर शोधून दाखवा!

ऑप्टिकल भ्रम हे एक प्रकारचे कोडे असते. ही सोडवण्याची एक वेगळी मजा असते. महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीचे कोडे सोडवण्यासाठी तुम्हाला एक वेळ ठरवून दिला जातो. या वेळेत तुम्हाला हे कोडे सोडवायचे असते. हे चित्र बघताना किचकट वाटते पण निरीक्षण चांगलं असेल तर नक्कीच कोडे लवकर सोडवले जाते. आपले निरीक्षण कौशल्य आश्चर्यकारक आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही हे ऑप्टिकल भ्रम सोडवून दाखवा.

Optical Illusion | या चित्रात लपलेली मगर शोधून दाखवा!
spot the crocodile
| Updated on: Aug 16, 2023 | 12:45 PM

मुंबई: सोशल मीडियावर एक ऑप्टिकल भ्रम व्हायरल झाला आहे, ज्याने लोकांना खूप गोंधळून टाकलंय. व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला ड्रॅगनचा ग्रुप दिसेल. पण कलाकाराने हुशारीने त्यात कुठेतरी तीन मगरी लपवून ठेवल्या आहेत. ड्रॅगन आणि मगरीच्या शरीराचा रंग जवळजवळ सारखाच असल्याने तो शोधण्याचे आव्हान अधिकच अवघड होऊन बसते. आपले निरीक्षण कौशल्य आश्चर्यकारक आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही हे ऑप्टिकल भ्रम सोडवून दाखवा.

तीन मगरींचा शोध घेता येईल का?

सोशल मीडिया युजर्सना पुरतं गोंधळून टाकणाऱ्या या व्हायरल ब्रेन टीझरमध्ये ड्रॅगनमध्ये लपलेल्या तीन मगरींचा शोध घेता येईल का? जर तुमची दृष्टी गरुडासारखी तीक्ष्ण असेल आणि विचार चित्तापेक्षा वेगवान असेल तर तुम्हाला या मायावी मगरी सापडतील. पण हे काम तितकं सोपं नाही हे लक्षात ठेवा. कारण, हंगेरीचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार गेर्झली डुडास यांनी याची निर्मिती केली आहे. लक्षात ठेवा त्यांनी तयार केलेले ऑप्टिकल भ्रम प्रचंड अवघड असतात.

तुमच्याकडे फक्त 10 सेकंद

आता वेळ न दवडता वर दिलेले चित्र बारकाईने बघा. आजचे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 10 सेकंद आहेत. आम्हाला आशा आहे की आपण चतुराईने लपलेल्या तीन मगरी शोधू शकाल. जर तुम्हाला मगरी सापडल्या असतील तर तुमचे अभिनंदन. त्याचवेळी उत्तर सापडले नसेल तरी फरक पडत नाही. नियमित सराव करूनच सर्व काही साध्य करता येते. तुम्ही रोज ही कोडी सोडावा आणि या गेमचे मास्टर व्हा. खाली आम्ही एक फोटो देत आहोत ज्यामध्ये पांढऱ्या वर्तुळात सांगितले आहे की मगरी कुठे आहेत?

here is the crocodile