या चित्रात साप कुठे आहे सांगा!

फक्त जिराफ दिसतायत. पण खरं तर या चित्रात एक साप सुद्धा आहे. त्यांच्यामध्ये एक सापही लटकलेला आहे. पण तो इतक्या सहजासहजी दिसत नाही. तो साप शोधून तो साप कुठे आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे.

या चित्रात साप कुठे आहे सांगा!
Spot the snake in this picture
| Updated on: Jun 25, 2023 | 12:04 PM

मुंबई: ऑप्टिकल भ्रम (Optical Illusion) ही संकल्पना मेंदूला चालना देण्यासाठी बनविण्यात आलीये. ऑप्टिकल भ्रमाचे असेच एक अवघड चित्र समोर आले आहे, ज्यात काही जिराफ दिसत आहेत. त्यात फक्त जिराफ (Giraffe) दिसतायत. पण खरं तर या चित्रात एक साप (Snake) सुद्धा आहे. त्यांच्यामध्ये एक सापही लटकलेला आहे. पण तो इतक्या सहजासहजी दिसत नाही. तो साप शोधून तो साप कुठे आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे.

खरं तर ऑप्टिकल इल्युजनचे हे चित्र नुकतेच सोशल मीडियावर समोर आले आहे ज्यामध्ये एक साप लपलेला आहे आणि तो साप कुठे आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे. या फोटोत सर्व जिराफांच्या फोटोत तो धोकादायक सापही आहे. हे चित्र गोंधळात टाकणारं आहे. ऑप्टिकल भ्रमही शास्त्रज्ञांना अनेकदा विचार करायला भाग पाडतात..

एखाद्या चित्राबद्दल बोलताना आपला मेंदू कसा काम करतो हे समजून घेण्यासही अशी चित्रे मदत करतात. या फोटोची गंमत म्हणजे हा साप अजिबात दिसत नाही. या फोटोत अनेक जिराफ आजूबाजूला असून केवळ त्यांची मान दिसत आहे. पण सगळ्या जिराफांमध्ये अचानक साप दिसत नाही.

खरं तर या फोटोत हा साप वरपासून खालपर्यंत लटकलेला आहे. वरच्या उजवीकडून पाचव्या जिराफानंतर जे दिसतं ते म्हणजे साप. हा साप अगदी जिराफसारखा दिसतो. साप दिसलाच नाही असे चित्र होते, पण नीट पाहिल्यावर साप कुठे आहे हे कळते.

Here is the snake