Viral Video : पाकिस्तानातील मुलाचा गोड गळा, भारतीयांना लावला लळा, व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल…

Viral Video : पाकिस्तानातील मुलाच्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानसहित भारतीयांनाही आवडला आहे.

Viral Video : पाकिस्तानातील मुलाचा गोड गळा, भारतीयांना लावला लळा, व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल...
viral video news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 30, 2026 | 8:15 PM

सोशल मीडियावर काही व्हिडिओ तुमचं पटकन लक्ष वेधून घेतात. कधी कधी व्हिडिओ पाहून चेहऱ्यावर हास्य देखील फुलतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मनात घर करून बसला आहे. पाकिस्तानातील एका मुलाच्या कव्वालीचा हा व्हिडिओ आहे. त्याच्या गोड गळ्यावर नेटकरी फिदा झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाकिस्तानच्या लाहोरमधील या मुलाची देखील चर्चा होत आहे.

पाकिस्तानमधील छोटा नुसरत….व्हिडिओ व्हायरल 

Loading...

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ हा पाकिस्तानातील लाहोरमधील एका संगीत अकादमीमधील आहे.  या मुलासोबत नॉर्वेमधील प्रसिद्ध डान्स ग्रुप ‘क्विकस्टाइल’ मेंबर व्हिलियम गॅम्बर्ग देखील आहे. व्हिडिओ लहान लहान मुले दिसत आहेत. सर्व जण गाणं गाताना दिसत आहेत. नेटकरी गाण्याच्या प्रेमात पडले आहेत. सोशल मीडियावरील हा व्हिडिओ भारत आणि पाकिस्तानमधील प्रेमाचा वर्षाव करत आहे. अनेक भारतीय त्याला छोटा नुसरत म्हणून हाक मारत आहे. लाहोरच्या एका संगीत अकादमीमधील गाणं सीमा ओलांडून भारतातही व्हायरल झालं आहे. अब्दुल रहमान असे गाणं गाणाऱ्या मुलाचं नाव आहे. भारतासहित जगभरातील लोकांनी अब्दुल रहमानवर प्रेमाचा वर्षाव केलाय.

अनेक भारतीयांच्या आवडला गोड गळा 

तत्पूर्वी,  लाहोरमधील ही अकादमी मोफत संगीत शिकवते. ही अकादमी 2016 रोजी सुरू झाली. या अकादमीत गरीब कुटुंबातील मुलं संगीत शिकण्यास येतात. या अकादमीमधील मुलांनी लोकांमध्ये चांगलंच नाव कमावलं आहे. या व्हिडिओतून हे सिद्ध होत आहे. व्हिलियम गॅम्बर्गने शेअर केलेल्या व्हिडिओ सहा लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर बारा हजारांहून अधिक प्रतिक्रिया या व्हिडिओला मिळाल्या आहेत. अनेकांनी या छोट्या गायकाचं कौतुक केलं आहे.  भारतामधील अनेकांनी या मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ सेलिब्रिटी मंडळींनी देखील व्हिडिओवर मनापासून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही सेलिब्रिटींनी मुलाच्या गाणयाचा व्हिडिओ शेअर देखील केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us