VIDEO | टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे लोकं नाराज, पण या व्यक्तीचं गाणं ऐकून मूड ठीक होतोय का पाहा

सध्या महाराष्ट्रात पालेभाज्यांचे दर गगनाला फिडले आहेत. टोमॅटो सगळ्यात महाग झाला आहे. परंतु सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो पाहून तुमचा मूड ठिक होतोय का पाहा.

VIDEO | टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे लोकं नाराज, पण या व्यक्तीचं गाणं ऐकून मूड ठीक होतोय का पाहा
tomato rate high
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 08, 2023 | 3:58 PM

मुंबई : सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral) झाला आहे. त्या व्हिडीओला अधिक प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. भारतात सध्या सगळीकडं टोमॅटो महाग (tomato rate high) झाला आहे. सध्या टोमॅटोचा दर 155 रुपये प्रति किलो आहे. दर वाढल्यामुळे सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल (mims viral) झाले आहेत. सध्याचा दर अधिक असल्यामुळे एका कंटेंट क्रिएटरने एक व्हिडीओ तयार केला आहे. तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

खुशाल आणि त्याचे साथीदार व्हिडीओत दिसत असलेल्या गाण्यावर नाचत आहेत. ‘तुम तुम’ या लोकप्रिय तमिळ गाण्याच्या मुझीकवर आधारित, विडंबन गाण्याचे बोल अनेकांना आवडले आहेत. टोमॅटो किती महाग झाला. सांबरपासून पावभाजापर्यंत जेवणात प्रत्येक गोष्टीत टोमॅटो लागतो. त्यामुळे सामान्य लोकांना जेवणाचा आनंद घेणं कठीण झालंय.

सध्याचा व्हायरल व्हिडीओ 6 लाख पेक्षा अधिक लोकांनी लाईक केला आहे. त्याचबरोबर त्याला अधिक प्रतिक्रिया सुध्दा आल्या आहेत. काही लोकांनी त्या कमेंट केली आहे की, खुशालने आपल्या विडंबन गाण्यात मध्यमवर्गीयांच्या अवस्थेचे किती अचूक वर्णन केले आहे. त्यामुळे लोकांनी त्याचं कौतुक केलं आहे.


मेट्रो शहरात टोमॅटोची किंमत 58 ते 148 रुपये आहे. कोलकत्ता शहरात सगळ्यात जास्त टोमॅटो महाग आहे. मुंबई सगळ्या स्वस्त टोमॅटो आहे. दिल्ली आणि चैन्नई या भागात टोमॅटोची किंमत १०० च्या आसपास आहे.

यंदा देशात मान्सून उशीर दाखल झाल्यामुळे पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसात पुन्हा दर स्थिर होतील अशी माहिती शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.